स्वित्झर्लंडचा अव्वल टेनिसपटू रॉजर फेडरर याने काही दिवसांपूर्वीच निवृत्ती जाहीर केली. दरम्यान ४१ वर्षीय फेडररने शुक्रवारी, २३ सप्टेंबरला अखेरचा सामना खेळाला. मात्र, सामन्यानंतर त्याला आपले अश्रू आवरणे कठीण झाले. यावेळी चाहत्यांनीच नाही, तर जोडीदार राफेल नदाल यानेही फेडररला भरल्या डोळ्यांनी भावनिक निरोप दिला. या सामन्यादरम्यान स्पॅनिश टेनिस स्टार राफेल नदाल फेडररचा जोडीदार होता.

आपल्या शेवटच्या सामन्यात मात्र फेडररला विजयाची गवसणी घालता आली नाही. लंडन येथे खेळवण्यात आलेल्या या सामन्यात अमेरिकेचे फ्रान्सिस टियाफो आणि जॅक सॉक हे फेडररचे प्रतिस्पर्धी होते. या सामन्यात त्याला ४-६, ७-६ (२), ११-९ ने हार पत्करावी लागली. या मॅचनंतर फेडररला भावनिक निरोप दिला गेला.

ranveer singh share joy after being father
Video : “तो क्षण जादुई…”, रणवीर सिंहने बाबा झाल्यानंतर भर कार्यक्रमात व्यक्त केल्या भावना; व्हिडीओ झाला व्हायरल
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
diljit dossanj back a girl who cried in concert
Video : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये रडल्याने तरुणी झाली ट्रोल, गायक बाजू घेत म्हणाला, “तुम्ही देशाच्या…”
Emotional message for father
“डोळ्यातले अश्रु डोळ्यांतच जिरवण्याची ताकद फक्त ‘बापाकडे’ असते” तरुणाची पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
Sanju Samson father Viswanath video viral
Sanju Samson : ‘३-४ लोकांमुळे माझ्या मुलाची १० वर्षें वाया गेली…’, संजू सॅमसनच्या वडिलांचे धोनी-विराटसह रोहित शर्मावर गंभीर आरोप, VIDEO व्हायरल
nitish kumar bows down to touch feet of pm modi
VIDEO: भरसभेत नितीश कुमार पाया पडायला गेले अन् नरेंद्र मोदींनी…; नेमकं काय घडलं?
Tragic Video! Devotee Collapses And Dies Of Heart Attack While Circumambulating Pillar At Hyderabad Temple
बिनभरवशाचं आयुष्य! देवाच्या दारात तरुणाला मृत्यूनं कवटाळलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले “देवालाही दया आली नाही”

दरम्यान, या क्षणांचे व्हिडीओ तुफान व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये, सामान्यांच्या अखेरीस फेडररच्या डोळ्यातील अश्रू आपण स्पष्टपणे पाहू शकतो. त्याच्याच शेजारी बसलेला राफेल नदालही आपले अश्रू रोखू शकला नाही. यानंतर सर्बियाचे स्टार प्लेअर नोवाक जोकोविच यांच्यासह अनेक खेळाडू तिथे उपस्थित होते. फेडररने त्यांची भेट घेऊन त्यांना आणि टेनिस खेळाला निरोप दिला. यावेळी राफेल नदालसह इतर खेळाडूही भावूक झाले.

पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकण्याच्या बाबतीत रॉजर फेडरर तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत २२ ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली आहेत. तर सर्वाधिक २२ ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकून राफेल नदाल या यादीत अव्वल स्थानावर आहे. २८ जानेवारी २०१८ रोजी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये फेडररने आपले शेवटचे ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकले. त्यानंतर त्याने क्रोएशियाच्या मारिन सिलिकचा पराभव केला. त्यावेळी २० ग्रँडस्लॅम जिंकणारा तो पहिला पुरुष खेळाडू ठरला. मात्र, या वर्षाच्या शेवटी राफेल नदालने त्याचा विक्रम मोडला.

फेडररने १५ सप्टेंबर रोजी सोशल मीडिया पोस्ट शेअर करून टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली. फेडरने लिहिले, ‘मी ४१ वर्षांचा आहे. मी या २४ वर्षात १५००हून अधिक सामने खेळले आहेत. टेनिसने मला पूर्वीपेक्षा जास्त उदारतेने वागवले आहे आणि आता माझी स्पर्धात्मक कारकीर्द कधी संपेल हे मला जाणून घ्यावे लागेल.’

सर्वाधिक पुरुष एकेरी ग्रँडस्लॅम विजेते :

१. राफेल नदाल (स्पेन) – २२ (ऑस्ट्रेलियन – २, फ्रेंच – १४, विम्बल्डन – २, यूएस – ४)

२. नोव्हाक जोकोविच (सर्बिया) – २१ (ऑस्ट्रेलियन – ९, फ्रेंच – २, विम्बल्डन – ७, यूएस – ३)

३. रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड) – २० (ऑस्ट्रेलियन – ६, फ्रेंच – १, विम्बल्डन – ८, यूएस – ५)

४. पीट सॅम्प्रास (यूएसए) – १४ (ऑस्ट्रेलियन – २, फ्रेंच – ०, विम्बल्डन – ७, यूएस – ५)

ऑस्ट्रेलियन ओपननंतर फेडररवर वयाचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येत होता. त्याचा फॉर्मही घसरला. दुखापतीमुळे फेडररला यावर्षी एकाही ग्रँडस्लॅममध्ये भाग घेता आला नाही. फेडररने शेवटच्या वेळी २०२१ फ्रेंच ओपनमध्ये भाग घेतला होता.