टेनिस खेळण्यासाठी पहिल्यांदाच भारतात दाखल झालेल्या रॉजर फेडररने काटेकोर आहाराचे नियम बाजूला ठेवत भारतीय पदार्थाचा उत्तम आस्वाद घेतला. विविध स्पर्धाच्या निमित्ताने भारतात येणारे खेळाडू मसाल्यांचा सढळहस्ते समावेश असलेले भारतीय पदार्थ खाताना साशंक असतात. मात्र भारतीय संस्कृती, आहारपद्धती याविषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या फेडररने भल्यामोठय़ा नानवर ताव मारला. खमंग व कुरकुरीत नान आवडल्याचेही फेडररने मग आवर्जून सांगितले. जेवणामध्ये फेडररने सिकंदरी रान, मुर्ग मलई कबाब, शीग कबाब, तंदुरी गोभी, तंदुरी आलू, दाल बुखारा व नान बुखारा अशा रुचकर पदार्थाचा आस्वाद घेतला. जेवणानंतर गोड पदार्थामध्ये फेडररने कुल्फी, फिरनी, गुलाबजाम यांचा आनंद घेतला.

Story img Loader