ग्रँड स्लॅम जेतेपदांचा तीन वर्षांहून अधिक कालावधीचा दुष्काळ संपवण्यासाठी आतूर रॉजर फेडररने येत्या रविवारपासून सुरू होत असलेल्या फ्रेंच खुल्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने फेडररने हा निर्णय घेतला आहे.
फेडररच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या माद्रिद स्पर्धेतून फेडरनने पाठीच्या दुखापतीमुळे माघार घेतली होती. या निर्णयामुळे सलग ६५ ग्रँड स्लॅम स्पर्धा खेळण्याचा फेडररचा विक्रम खंडित होणार आहे. ‘‘शरीर १०० टक्के साथ देईल, याची खात्री नसताना खेळण्याचा धोका पत्करणे योग्य नाही. हा निर्णय घेणे सोपे नव्हते. लवकरच परतेन,’’ असे फेडररने ‘फेसबुक’वर सांगितले.

Story img Loader