रॉजर फेडररने गर्भवती पत्नी मिर्कासोबत राहण्यासाठी माद्रिद टेनिस स्पर्धेतून माघारीची घोषणा केली. यानंतर अवघ्या काही तासांत फेडररने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून गोड बातमीही जाहीर केली.
“लिओ आणि लेनी या जुळ्या मुलांना मिर्काने जन्म दिला असून, सर्व चाहत्यांना ही गोष्ट सांगताना अत्यंत आनंद होत आहे.”  असे ट्विट फेडररने केले आहे.पाच वर्षांपूर्वी रॉजर आणि मिर्का फेडरर दांपत्याला जुळे कन्यारत्न झाले होते. या लेकी टेनिस विश्वात चॅम्पियन होतील असे अंदाजही बांधण्यात आले. या सावित्रीच्या लेकींना मिश्र दुहेरीसाठी साथीदार या जुळ्या मुलांच्या रुपाने घरातच मिळाले आहेत. जुळी मुले ही काही अनोखी गोष्ट नाही. परंतु, त्यापाठोपाठ दोन जुळी मुले असा दुर्मीळ योग फेडररच्या घरी जुळून आला आहे. पुन्हा जुळ्या मुलांच्या रुपात फेडररला मिळालेल्या गोड बातमीचे अभिनंदन करत बोरीस बेकर, जस्टीन जिमेल्स्टोब अशा टेनिस दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Story img Loader