रॉजर फेडररला यंदा एकही ग्रॅण्डस्लॅम स्पर्धाजिंकता आलेली नसली तरी त्याने टेनिसद्वारे कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अग्रस्थान पटकावले आहे. फोर्ब्स नियतकालिकाने श्रीमंत टेनिसपटूंची यादी तयार केली आहे.  फेडररने ५६.२ दशलक्ष डॉलर्सची (३४० कोटी रुपये) कमाई केली आहे. त्याला रोलेक्स व नाईके या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून करारबद्ध केले आहे. फेडरर याने यंदा विम्बल्डन स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते.  
फ्रेंच स्पर्धा जिंकणारा स्पेनचा खेळाडू रॅफेल नदालने या यादीत दुसरे स्थान घेतले आहे. सर्बियाच्या नोवाक जोकोव्हिचने तिसरा क्रमांक मिळविला आहे.
महिलांमध्ये रशियाची सौंदर्यवती खेळाडू मारिया शारापोव्हाने महिलांच्या यादीत अग्रस्थान मिळविले आहे. तिने २४.४ दशलक्ष डॉलर्सची (१४७.६० कोटी रुपये) कमाई केली आहे. चीनची ली ना हिला महिलांमध्ये दुसरे स्थान आहे. तिने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धाजिंकली होती. सेरेना विल्यम्स हिला तिच्याखालोखाल स्थान मिळाले आहे.    

Story img Loader