स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर याचा आज वाढदिवस. आज फेडररने ३८व्या पदार्पण केले. फेडरर हा एक अत्यंत प्रतिभावान खेळाडू आहे. तो टेनिस कोर्टवरील त्याच्या शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखला जातो. पण एकदा असभ्य वर्तनासाठी फेडररला चक्क प्रसाधनगृह स्वच्छ करावे लागले होते. शिक्षा म्हणून त्याने चक्क आठवडाभर टॉयलेट स्वच्छ केले होते.

फेडरर हा सध्या एक परिपक्व आणि संयमी असा खेळाडू म्हणून परिचित आहे. पण एका स्थानिक सामन्यात फेडरर खेळत होता. टेनिस खेळण्यास सुरुवात केल्यानंतर सुरुवातीच्या काळात ही घटना घडली. बीएल-स्वित्झर्लंड नॅशनल टेनिस सेंटर येथे सुरु असलेल्या सामन्यात फेडररने रागाने रॅकेट आपटली. १६व्या वर्षी टेनिस कोर्टवर सराव करत असताना त्याने रॅकेट फेकली होती. ती रॅकेट कोर्टशेजारील पडायला लागली. त्याचे हे असभ्य वर्तन संबंधितांना अजिबात रुचले नाही. त्यामुळे या घटनेनंतर फेडररला शिक्षा म्हणून आठवडाभर टॉयलेट स्वच्छ करावे लागले होते.

दरम्यान, सध्या टेनिस कोर्टवर फेडररची ओळख ही अत्यंत शांत खेळाडू म्हणून करून दिली जाते. फेडररच्या या स्वभावाचे कौतुक सर्वत्र केले जाते. इतकेच नव्हे तर फेडररच्या या स्वभावाची तुलना मैदानावरील शांत आणि संयमी असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्याशीदेखील केली जाते.