रॉजर फेडररने टॉमस बर्डीचवर ३-६, ६-४, ६-३ अशी मात करत दुबई टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
गेल्यावर्षी याच स्पर्धेत बर्डीचने उपांत्य फेरीत फेडररला नमवले होते. या पराभवाची परतफेड करत फेडररने यंदा जेतेपदाची कमाई केली. अंतिम फेरीपर्यंत आगेकूच करताना फेडररने अव्वल मानांकित नोव्हाक जोकोव्हिचलाही नमवले होते. या स्पर्धेचे फेडररचे हे सहावे जेतेपद आहे. गेल्यावर्षी फेडररला एकही ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावता आले नव्हते. यावर्षीची पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेतही फेडररचे जेतेपदाचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.  गेल्यावर्षी त्याने हाले येथे झालेल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते, त्यानंतरचे फेडररचे हे पहिलेच जेतेपद आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा