स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया पार पडली. गुडघ्याच्या दुखापतीमुळे फेडररनं अमेरिकन ओपन स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यानंतर त्याच्या उजव्या गुडघ्यावर तिसऱ्यांदा शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. २०२० या वर्षात झालेल्या दोन शस्त्रक्रियानंतर फेडरर टेनिस कोर्टपासून दूरच होता.

“सर्वात वाईटस्थिती माझ्या मागे आहे. मी येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना करत आहे. दुखापतीनंतर परत येता तेव्हा तुमचा प्रत्येक दिवस चांगला असतो. मी गेल्या वर्षी यातून गेलो आहे. पण ही मानसिक समस्या नाही. मला आता बरं वाटत आहे. मला आशा आहे की, मी लवकरच यावर मात करेन. मला आता कोणतीच अडचण जाणवत नाही. आता मी ताकदीने जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर टेनिस कोर्टवर परत येईल. पण यासाठी मला थोडा धीर धरावा लागेल.”, असं रॉजर फेडररनं शस्त्रक्रियेनंतर यूरोस्पोर्ट्सला सांगितलं आहे.

“विराट कोहलीने दोन चौकार मारले असते, पण…”; पार्थिव पटेलने व्यक्त केलं मत

फेडरर २०२० ऑस्ट्रेलिया ओपननंतर जवळपास एक वर्ष टेनिस कोर्टपासून दूर होता. त्यानंतर मे महिन्यात फ्रेंच ओपनमध्ये त्याने पुनरागमन केलं. मात्र तीन विजयानंतर त्याने माघार घेतली. त्यानंतर विम्बलडनमध्ये उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला. गुडघ्याच्या दुखापतीमुळे टोक्यो ऑलिम्पिकमध्येही खेळला नव्हाता. रॉजर फेडररने २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचा किताब आपल्या नावावर केला होता.