भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षक ताफ्यात आणखी एका व्यक्तीचा समावेश करण्यात आला आहे. संघासाठी डावपेच प्रशिक्षक म्हणून डच प्रशिक्षक रॉजर व्हान डेन्ट यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रॉजर हे भारतीय संघाच्या उच्च कामगिरीचे संचालक व मुख्य प्रशिक्षक रोलँन्ट ओल्टमन्स यांना साहायक म्हणून काम पाहतील. जागतिक लीग उपांत्य फेरीपासून त्यांच्या कामकाजास सुरुवात होईल व रिओ ऑलिम्पिक होईपर्यंत त्यांच्याकडे डावपेच प्रशिक्षकपदाची जबाबदारी राहणार आहे.
रॉजर यांनी २००० मध्ये आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचा उच्च कामगिरी प्रशिक्षकाचा दर्जा मिळविला. त्यानंतर त्यांनी नेदरलँड्समधील विविध स्थानिक संघांबरोबर काम केले आहे.
हॉकी इंडियाचे सरचिटणीस महंमद मुश्ताक अहमद यांनी सांगितले, रॉजर यांच्या अनुभवाचा फायदा भारतीय खेळाडूंना निश्चितपणे होईल. विशेषत: ऑलिम्पिकसाठी तयारी करताना त्यांच्या ज्ञानाचा लाभ आमच्या खेळाडूंना घेता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा