‘इंडो-पाक एक्स्प्रेस’ अर्थात रोहन बोपण्णा आणि ऐसाम उल हक कुरेशी जोडीने विजयी सलामीसह पुनरागमन केले. एटीपी एपिआ आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत तृतीय मानांकित जोडीने एक तास आणि ४१ मिनिटांच्या लढतीत जिन ज्युलियन रॉजर आणि होरिआ टेकाऊ जोडीवर ७-६(५), ६-७(२), १०-३ असा विजय मिळवला. दुसऱ्या फेरीत या जोडीचा मुकाबला ट्रिट ह्य़ू आणि डॉमिनिक इंगलोट जोडीशी होणार आहे. बोपण्णा-कुरेशी जोडीला चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेत सलामीच्या लढतीतच धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले होते. एकेरी प्रकारात भारताच्या सोमदेव देववर्मनचे आव्हान दुसऱ्या फेरीतच संपुष्टात आले.

Story img Loader