रिओ येथे ऑगस्टमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये सानिया मिर्झाबरोबर मिश्र दुहेरीतील सहकारी होण्याबाबत सध्या विचार केलेला नाही. तूर्तास पहिल्या दहा क्रमांकामध्ये कसे स्थान राहील, यावर मी लक्ष केंद्रित केले आहे, असे भारताचा अव्वल दर्जाचा टेनिसपटू रोहन बोपण्णा याने सांगितले. अनुभवी खेळाडू लिएण्डर पेसने सानियाबरोबर खेळण्याची तयारी यापूर्वीच दर्शवली आहे. यासंदर्भात बोपण्णा म्हणाला, ‘‘ऑलिम्पिकला अजून बराच वेळ आहे. मे-जूनमध्ये होणाऱ्या फ्रेंच स्पर्धेचा मी विचार करीत आहे. ऑलिम्पिकपूर्वी दुबई खुल्या स्पध्रेपासून ते इंडियाना वेल्सपर्यंत अनेक स्पर्धामध्ये मी खेळणार आहे. या स्पर्धामध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करीत पहिल्या दहा क्रमांकामध्ये स्थान टिकविण्यावर माझा भर राहील. कोणाबरोबर खेळावयाचे याबाबत मी विचार करीन.’’ ६ रोजी मानांकने जाहीर होतील, त्याआधारे रिओ ऑलिम्पिकसाठी पात्रता निश्चित होईल.

Story img Loader