Rohit Paudel said we have planned a special strategy for Rohit and Virat: आशिया चषक २०२३ स्पर्धेतील पाचवा सामना आज नेपाळ आणि भारत यांच्यात खेळला जात आहे. हा सामना श्रीलंकेतील कँडी येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला. सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी नेपाळचा कर्णधार रोहित पौडेलने एक मोठा खुलासा केला. तो म्हणाला आम्ही रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी एक खास रणनीती आखली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित-कोहलीसाठी तयार आहे खास प्लॅन –

नेपाळचा कर्णधार रोहित पौडेलने रविवारी सांगितले की, मी विराट कोहली आणि रोहित शर्माविरुद्ध आपली योजना तयार केली आहे. रोहित म्हणाला, “विराट कोहली आणि रोहित शर्मा १० वर्षांहून अधिक काळ टीम इंडियाचे स्टार आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी आम्ही योजना तयार केली आहे. आम्ही त्याची अंमलबजावणी करू शकू अशी आशा आहे.”

टीम इंडियाविरुद्ध खेळण्यासाठी पौडेल उत्साहित –

भारतासारख्या दिग्गज संघाविरुद्ध खेळल्याने त्याच्या क्रिकेट प्रवासात खूप मदत होईल, असेही तो म्हणाला. पौडेल म्हणाला, “आम्ही सर्वजण खूप उत्सुक आहोत, विशेषत: भारताविरुद्ध खेळण्यासाठी. अशा संधी आम्हाला अनेकदा मिळत नाहीत. त्यामुळे सर्वात मोठ्या व्यासपीठावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची आम्ही सर्वांसाठी ही मोठी संधी आहे.”

हेही वाचा – AFG vs BAN: २३ वर्षीय गोलंदाजाच्या ‘या’ कृतीवर संतापला अफगाणिस्तानचा फलंदाज, पाहा VIDEO

पावसाचा सामन्यावर परिणाम होईल का?

सोमवारी पाऊस पडणार नाही, अशी अपेक्षा पौडेलने व्यक्त केली. मात्र सोमवारी ७० टक्के पावसाचा अंदाज आहे. पौडेल म्हणाला, “हवामान आमच्या नियंत्रणात नाही. पण मोठ्या मंचावर आपली प्रतिभा दाखवण्यासाठी भारताविरुद्ध खेळण्याची संधी मिळेल, अशी आम्हाला आशा आहे. अशा संधीशिवाय आम्हाला फक्त छोट्या संघांसोबत खेळण्याची संधी मिळते. आम्हाला अशा संधींचा फायदा घ्यायचा आहे जेणेकरून क्रिकेट जगत आमच्याकडे लक्ष देऊ शकेल.”

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

हेही वाचा – IND vs PAK: “…तेव्हापासून हार्दिक पांड्या जबाबदारी घ्यायला शिकला”; मोहम्मद कैफने उधळली स्तुतीसुमने

नेपाळ : कुशल भुर्तेल, आसिफ शेख (यष्टीरक्षक), रोहित पौडेल (कर्णधार), भीम शार्की, सोमपाल कामी, गुलसन झा, दीपेंद्र सिंग आयरे, कुशल मल्ला, संदीप लामिछाने, करण केसी, ललित राजबंशी.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit paudel said that we have planned a special strategy for rohit sharma and virat kohli in ind vs nep vbm