Rohit Sharma’s statement on DRS: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये टीम इंडियाने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. भारताने सलग ७ विजयांसह उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने डीआरएसचा केलेला वापर संघासाठी खूप फायदेशीर ठरला आहे, असे असतानाही सामन्यानंतर रोहित शर्माने डीआरएसवर मोठे वक्तव्य केले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, भारतीय संघासाठी गोलंदाजी करताना मी डीआरएस घेणार नाही. रोहित शर्मा असं का म्हणाला? ते जाणून घेऊया.

केएल राहुलच्या हुशारीमुळे टीम इंडियाला मिळाली विकेट –

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान भारतीय संघ गोलंदाजी करत असताना श्रीलंकेचा एक फलंदाज बाद झाला, पण कोणीही याबाबत फारशी अपील केली नाही. त्यामुळे भारतीय कर्णधार रोहित शर्मासह गोलंदाजांना खेळाडू नाबाद असल्याचे जाणवले. त्यानंतर विकेटच्या मागून उपकर्णधार केएल राहुलने रोहित शर्माला सांगितले की, फलंदाज बाद आहे, डीआरएस घ्या. राहुलच्या सांगण्यावरून रोहितने शेवटच्या क्षणी डीआरएस घेतला. तिसर्‍या अंपायरने जेव्हा चेक केले, तेव्हा समजले की फलंदाज खरोखरच बाद होता. राहुलचा डीआरएस घेण्याचा निर्णय खूपच महत्त्वाचा होता. कारण फलंदाज बाद होईल याची कोणालाच खात्री नव्हती, पण केएल राहुलच्या हुशारीमुळे भारताला विकेट मिळाली.

IND vs BAN Rohit Sharma interacts with R Ashwin Daughters
IND vs BAN : विजयानंतर रोहित शर्माने पुन्हा एकदा जिंकली चाहत्यांची मनं, अश्विनच्या मुलींशी बोलतानाचा VIDEO व्हायरल
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास मंत्रिमंडळात कोण…
IND vs BAN 1st Test Ravichandran Ashwin reacts on India beat Bangladesh
IND vs BAN : ‘मला कोणीही…’, बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतरही अश्विन नाराज? म्हणाला, ‘म्हणून मी…’
Rohit Sharma Statement on India Win and Rishabh Pant IND vs BAN 1st Test
IND vs BAN: विजयानंतर ऋषभ पंतविषयी बोलताना रोहित शर्मा झाला भावुक, म्हणाला, “त्या कठीण काळात…”
Ravichandran Ashwin Jealous Statement on Ravindra Jadeja Says I Wish I Could be Him IND vs BAN
IND vs BAN: “मला जडेजाचा हेवा वाटतो, मी त्याच्यासारखा…”, अश्विनचे जडेजाबाबत चकित करणारं वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?
Rohit Sharma Became First Captain to Complete 1000 Runs in 2024 IND vs BAN 1st Test
IND vs BAN: रोहित शर्माने चेन्नई कसोटीत केला मोठा पराक्रम; २०२४ मध्ये ही कामगिरी करणारा ठरला पहिला कर्णधार
IND vs BAN Virat Kohli ask to Shakib Al Hasan funny question capture stump mic
Virat Kohli : ‘यॉर्करवर यॉर्कर टाकतोयस, तू काय मलिंगा…’, विराटने शकीबला विचारलेला प्रश्न स्टंप माईकमध्ये कैद, VIDEO व्हायरल
Tilak Verma Century at Duleep Trophy Suryakumar Yadav Shares Instagram Story said Best Birthday Gift
Tilak Verma Century: तिलक वर्माच्या शतकाचं आवेश खानने केलं सॅमी स्टाईल सेलिब्रेशन, सूर्यकुमार यादव पोस्ट करत म्हणाला “बेस्ट बर्थडे गिफ्ट…”

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर जेव्हा रोहितला रिव्ह्यू घेण्याच्या प्रक्रियेबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने स्पष्टपणे सांगितले की, तो हा निर्णय गोलंदाज आणि यष्टीरक्षकावर सोडतो. तो म्हणाला, “मी हा निर्णय गोलंदाज आणि यष्टीरक्षकावर सोडला आहे आणि मला विश्वास ठेवू शकेल असे खेळाडू शोधायचे आहेत. मला माहित आहे की डीआरएसचा निर्णय कोणाच्याही पक्षात जाऊ शकतो. आज आम्हाला एक योग्य आणि एक चुकीचा रिव्ह्यू मिळाला.”

हेही वाचा – World Cup 2023: टीम इंडियात परतण्यापूर्वी ऋषभ पंतने घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन, पाहा VIDEO

आता केएल राहुल डीआरएस घेईल – रोहित शर्मा

या सामन्यानंतर रोहित शर्माने केएल राहुलच्या डीआरएस घेण्याच्या निर्णयाचे कौतुक केले. रोहित म्हणाला की, ‘केएल राहुल हा एक जबाबदार खेळाडू आहे, तो फलंदाजांचे विकेटच्या मागून चांगले निरीक्षण करु शकतो की खेळाडू बाद होऊ शकतो की नाही.’ यावर रोहित मस्करी करताना म्हणाला की, ‘येथून पुढे उपकर्णधार केएल राहुल आणि गोलंदाज आपसात समन्वय साधून डीआरएसची मागणी करू शकतात.’ रोहित पुढे म्हणाला की, ‘आता मी माझ्या इच्छेने डीआरएसची मागणी करणार नाही. गोलंदाज आणि केएल राहुलला वाटत असेल की डीआरएस घ्यावा, तर डीआरएस घेतला जाईल.’

हेही वाचा – IND vs SL: मोहम्मद शमीच्या डोक्यावर बॉल ठेवण्याच्या कृतीबाबत शुबमन गिलकडून खुलासा, म्हणाला, “ड्रेसिंग रुम…”

भारताने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी (२ नोव्हेंबर) श्रीलंकेवर ३०२ धावांनी विजय मिळवला. टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. त्याने विश्वचषकाच्या इतिहासातील धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय मिळवला. यापूर्वी २००७ मध्ये बर्म्युडाचा २५७ धावांनी पराभव केला होता. भारताचा पुढील सामना आता रविवारी (५ नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.