Rohit Sharma Trolled for Choosing Fielding First IND vs AUS Gabba Test: भारत-ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमध्ये गाबाच्या मैदानावर खेळवला जात आहे. सध्या ५ सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा कसोटी सामना जिंकत कोणता संघ आघाडी मिळवणार यावर सर्वांच्या नजरा आहेत. तत्पूर्वी तिसऱ्या कसोटीची नाणेफेक जिंकत रोहितने प्रथम गोलंदाजी करण्याचा मोठा निर्णय घेतला. रोहितच्या प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णयावर सध्या प्रश्नचिन्ह उभारले जात आहे. खरं तर, ऑस्ट्रेलियामध्ये आतापर्यंत, भारतीय संघ कधीही नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करून सामना जिंकू शकला नाही. त्यामुळे रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी का घेतली, यामागची कारणं काय आहेत जाणून घ्या.

गाबाच्या मैदानावरील प्रथम गोलंदाजी करतानाचा रेकॉर्ड

Cricket Australia Breaks Silence on Not Inviting Sunil Gavaskar For Border Gavaskar Trophy Presentation
IND vs AUS: सुनील गावस्करांचा अपमान केल्याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं मोठं वक्तव्य, आपली चूक केली मान्य; नेमकं काय घडलं?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Border-Gavaskar Trophy Test series Team India defeat australia jasprit bumrah virat kohli rohit sharma
विश्लेषण : बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत टीम इंडियाच्या पराभवास कारणीभूत ठरले हे सहा घटक…
IND v AUS Australia wins BGT 2025 after 10 years against India
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाने १० वर्षांनी भारताला नमवत जिंकली बॉर्डर गावस्कर ट्रॉफी, WTC फायनलमध्ये मारली धडक
IND vs AUS Rohit Sharma Reaction
IND vs AUS : ‘क्रिकेट खेळा, फालतूच्या गोष्टी…’, बुमराह-कॉन्स्टास वादावर रोहित शर्माची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘आमचे खेळाडू…’
IND vs AUS Yashasvi Jaiswal Video Viral
IND vs AUS : यशस्वी जैस्वालची कसोटीत टी-२० शैलीत फटकेबाजी! मिचेल स्टार्कला फोडला घाम, VIDEO व्हायरल
IND vs AUS 5th Test Irfan Pathan reaction on Rohit Sharma after he opt to drop from Sydney match
IND vs AUS : ‘…हे स्वतः फलंदाजाला कळतं’, रोहित शर्माबद्दल इरफान पठाणचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘प्रत्येक खेळाडू…’
IND vs AUS 5th Test Predicted Playing 11 Full Squad Players List Match Timing Live Telecast
IND vs AUS: रोहित शर्माच्या विश्रांतीच्या निर्णयानंतर प्लेइंग इलेव्हन कशी असणार? सिडनी कसोटी किती वाजता सुरू होणार?

२००० सालानंतर गाबाच्या मैदानावर २४ सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत प्रथम फलंदाजी करताना सरासरी ३४९ धावांचा रेकॉर्ड आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघांना फायदा झाला आहे. ताज्या खेळपट्ट्यांवर प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघांना दोनदा विरोधी संघाला २०० धावांच्या आत रोखण्यात यश आले आहे.

हेही वाचा – IND vs AUS: गाबा कसोटीसाठी भारताची प्लेईंग इलेव्हन जाहीर, संघात २ मोठे बदल; हर्षित राणा-अश्विन…

गाबाच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना सामान्यतः अधिक उसळी आणि वेग मिळतो. यामुळे गेल्या २४ वर्षात वेगवान गोलंदाजांनी ३१ च्या सरासरीने ५६१ विकेट घेतल्या आहेत. तर फिरकीपटूंनी ४२ च्या सरासरीने १४२ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय या मैदानावर आतापर्यंत झालेल्या एकूण ६६ सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करताना २६ वेळा विजय मिळवला आहे. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने २७ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, तर १३ सामने अनिर्णित राहिले. २०२१ नंतर गाबाच्या मैदानावर दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने ४ पैकी ३ सामने जिंकले आहेत.

हेही वाचा – VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम

खेळपट्टी आणि ढगाळ परिस्थिती

ब्रिस्बेनच्या खेळपट्टीवर हिरवं गवत आहे आणि साधारणपणे वर्षाच्या या कालावधीत या खेळपट्टीवर थोडा अधिक बाऊन्स मिळतो. २०२१ मधील ऐतिहासिक लढतीसाठी यजमानांनी जी खेळपट्टी तयार केली होती त्यापेक्षा यंदाची खेळपट्टी थोडी वेगळी आहे. शिवाय, रोहितने सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी करण्यामागील कारण म्हणून ढगाळ परिस्थितीचा स्पष्टपणे उल्लेख केला आणि रोहितचा हा निर्णय तार्किक असल्याने योग्य असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा – IND vs AUS: विराट कोहलीचं ऑस्ट्रेलियाविरूद्ध अनोखं ‘शतक’, सचिन तेंडुलकरनंतर ‘ही’ कामगिरी करणारा भारताचा फक्त दुसरा खेळाडू

भारताच्या फलंदाजी बाजूने केलेली निराशा

खेळण्याच्या परिस्थितीव्यतिरिक्त, भारतीय फलंदाजांना सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. याशिवाय वेगवान गोलंदाजीविरूद्ध आणि मुव्ह होणाऱ्या चेंडूविरुद्ध भारतीय फलंदाज संघर्ष करताना दिसले. भारतीय फलंदाज कांगारू संघाच्या वेगवान गोलंदाजी माऱ्यासमोर खेळताना फारसे आत्मविश्वासाने उतरले नव्हते आणि यजमानांना कठीण परिस्थितीत फलंदाजी करू देऊन भारताने निश्चितपणे आणखी एक फलंदाजी कोसळणे टाळल. त्यामुळे भारतीय फलंदाजीचा विचार करताही रोहितने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला असू शकतो.

हेही वाचा – Who is D Gukesh: कोण आहे डी गुकेश? वडिलांनी करिअर लावलं पणाला अन् लेक १८व्या वर्षी ठरला विश्वविजेता; वाचा त्याची कहाणी

कसोटी क्रिकेटमध्ये प्रथम फलंदाजी करणे हे सामान्यतः पारंपारिक मानले जात असले तरी, गाबाच्या मैदानावर सुरूवातीला वेगवान गोलंदाजांनी चांगली मदत मिळते आणि नंतर फलंदाजीसाठी ट्रॅक अधिक चांगला होतो. भारतीय गोलंदाजांची लाईन आणि लेंग्थ अचून नव्हती. त्यामुळे ख्वाजा आणि मॅकस्विनी यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. या मैदानावर ऑस्ट्रेलियाने अनेक सामने खेळले आहेत, त्यामुळे त्यांना मागे टाकणं टीम इंडियासाठी सोप नसणार आहे. अशा प्रकारे, रोहित शर्माचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय संघाच्या हिताचा आहे.

Story img Loader