सलामीवीर रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या बळावर भारताने तिरंगी एकदिवसीय क्रिकेट स्पध्रेतील वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात ५० षटकांत ७ बाद २२९ अशी समाधानकारक धावसंख्या उभारली.
वेस्ट इंडिजचा कर्णधार ड्वेन ब्राव्हो आणि वेगवान गोलंदाज रवी रामपॉल दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकले नाहीत. त्यामुळे किरॉन पोलार्डकडे नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली. पोलार्डने नाणेफेक जिंकताच भारतीय संघाला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले. चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेत सातत्याने दमदार सलामी नोंदवणाऱ्या शिखर धवन आणि रोहित शर्मा या भारताच्या सलामीच्या जोडीला फक्त २६ धावा काढता आल्या. केमार रोचने स्वत:च्याच गोलंदाजीवर धवनचा (११) झेल घेत भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर विराट कोहली (११)चा अडसर डॅरेन सॅमीने दूर केला. त्यानंतर रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी रचून भारताला शतकासमीप पोहोचवले. परंतु मार्लन सॅम्युअल्सने कार्तिक (२३)ला बाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर ८९ चेंडूंत ४ चौकार आणि एका षटकारासह ६० धावा केल्या. सॅमीने त्याला तंबूची वाट दाखवली. मग सुरेश रैना (४४) आणि कप्तान महेंद्रसिंग धोनी (२७) यांनी पाचव्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली. केमार रोच, टिनो बेस्ट आणि सॅमी यांनी प्रत्येकी बळी घेतले.
धावफलक
भारत : रोहित शर्मा झे. चार्ल्स गो. सॅमी ६०, शिखर धवन झे. आणि गो. रोच ११, विराट कोहली झे. गेल गो. सॅमी ११, दिनेश कार्तिक झे. आणि गो. सॅम्युअल्स २३, सुरेश रैना झे. रामदिन गो. रोच ४४, महेंद्रसिंग धोनी त्रिफळा गो. बेस्ट २७, रवींद्र जडेजा त्रिफळा गो. बेस्ट १७, आर. अश्विन नाबाद ५ , भुवनेश्वर कुमार नाबाद ११, अवांतर : २०, एकूण ५० षटकांत ७ बाद २२९
बादक्रम : १-२५, २-३९, ३-९८, ४-१२४, ५-१८२, ६-१९७, ७-२१२
गोलंदाजी : केमार रोच १०-२-४१-२, टिनो बेस्ट १०-०-५४-२, डॅरेन सॅमी १०-३-४१-२, किरॉन पोलार्ड १-०-८-०, सुनील नरिन १०-०-५६-०, मार्लन सॅम्युअल्स ९-१-२०-१

  

Story img Loader