Rohit Sharma on Sunil Gavaskar: आजपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू होत आहे. डॉमिनिका येथे खेळली गेलेली पहिली कसोटी टीम इंडियाने एक डाव आणि १४१ धावांनी जिंकली होती. दुसरी कसोटी पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद येथे खेळवली जात आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार ब्रेथवेटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेगवान गोलंदाज मुकेश कुमार भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाने चांगली सुरुवात केली. भारतीय संघाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी उपाहारापर्यंत १२१ धावांची भर घातली आहे. यावेळी रोहित शर्मा १०२ चेंडूत ६३ धावा करून खेळत आहे. यशस्वी जैस्वाल ५६ चेंडूत ५२ धावा करून नाबाद परतली.
उपहारापर्यंत भारताने एकही विकेट न गमावता १२१ धावा केल्या आहेत. सध्या रोहित शर्मा १०२ चेंडूत ६३ धावा करून क्रीजवर आहे आणि यशस्वी जैस्वाल ५६ चेंडूत ५२ धावांवर खेळत आहे. वेस्ट इंडिजच्या भूमीवर भारतीय संघ पहिल्या दिवशी एकही विकेट न गमावता उपाहारापर्यंत पोहोचण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी २१ एप्रिल १९७६ रोजी गावसकर आणि अंशुमन यांनी किंग्स्टनमध्ये एकही विकेट न गमावता भारताला उपहारापर्यंत नेले होते. त्यानंतर पहिल्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत भारताने विकेट न गमावता ६२ धावा केल्या होत्या. तर १० जून २००६ रोजी दुसऱ्यांदा हा प्रकार घडला. त्यानंतर सेंट लुसियामध्ये पहिल्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत वसीम जाफर आणि सेहवागने एकही विकेट पडू दिली नाही आणि १४० धावांची भर घातली. आता रोहित आणि यशस्वीने लंच ब्रेकपर्यंत एकही विकेट न गमावता १२१ धावांची भागीदारी केली आहे.
रोहित शर्माने सुनील गावसकर यांचा विक्रम मोडला
यासोबतच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. वास्तविक, भारतासाठी कसोटी सामन्यांमध्ये रोहित शर्माने सलामीवीर म्हणून २ हजार धावा पूर्ण केल्या. याशिवाय भारतीय कर्णधाराने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये २ हजार धावांचा आकडा पार केला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये २००० धावांचा आकडा पार करणारा रोहित शर्मा हा पहिला फलंदाज आहे. यापूर्वी, वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने शानदार शतक झळकावले होते. रोहित शर्माने भारतासाठी आतापर्यंत ५२ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ३६०३ धावा केल्या आहेत.
कर्णधार रोहित शर्माने अर्धशतक पूर्ण करत यशस्वीसह शतकी भागीदारीही पूर्ण केली. रोहितने आज कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून २००० धावा पूर्ण केल्या. भारताकडून सर्वात कमी इनिंग्जमध्ये २००० धावा करणारा तो दुसरा सलामीवीर ठरला. वीरेंद्र सेहवागने ३९ इनिंग्जमध्ये हा टप्पा ओलांडलेला. रोहितला ४० डाव खेळावे लागले आणि त्यआधी त्याने सुनील गावसकर यांचा (४३) आणि गौतम गंभीर (४३) यांचे विक्रम मोडले.
रोहित आणि यशस्वी यांनी दोन शतकांच्या भागीदारीसह उपखंडातील मालिकेत म्हणजेच परदेशी भूमीवर कसोटी मालिकेत भारतीय सलामीवीरांनी केलेल्या सर्वाधिक शतकी भागीदारीच्या बाबतीत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर पोहोचले आहे. या दोघांपूर्वी सुनील गावस्कर आणि चेतन चौहान (इंग्लंड, १९७९), वीरेंद्र सेहवाग आणि आकाश चोप्रा (ऑस्ट्रेलिया, २००३/०४) आणि वीरेंद्र सेहवाग आणि वसीम जाफर (वेस्ट इंडीज, २००६) यांनी प्रत्येकी दोनदा असे केले आहे.