चेन्नई सुपरकिंग्जवर ४६ धावांनी मात करत मुंबई इंडियन्स गुणतालिकेत आपलं दुसरं स्थान पुन्हा एकदा मिळवलं. १५६ धावांचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ १०९ धावांपर्यंत मजल मारु शकला. धोनीच्या अनुपस्थितीचा चेन्नईच्या संघाला चांगलाच फटका बसला. चेन्नईकडून मुरली विजयने ३८ धावांची खेळी करुन मुंबईच्या गोलंदाजांना चांगली झुंज दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईने सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना १५५ धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात ६७ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. चेन्नईच्या संघाविरुद्ध रोहित शर्माची कामगिरी ही नेहमीच चांगली राहिली आहे. रोहित शर्माचं चेन्नईविरुद्धचं हे सातवं अर्धशतक ठरलं आहे. रोहित वगळता एकही फलंदाज चेन्नईविरुद्ध इतक्या अर्धशतकी खेळी करु शकलेल्या नाहीये.

मुंबईकडून गोलंदाजीमध्ये लसिथ मलिंगाने ४ बळी घेतले. त्याला कृणाल पांड्या-जसप्रीत बुमराह प्रत्येकी २-२ आणि हार्दिक पांड्या-अनुकूल रॉयने १-१ बळी घेत चांगली साथ दिली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma achieves unique milestone with 67 run knock against chennai super kings in ipl