Rohit Sharma press conference video goes viral : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाच्या घोषणेदरम्यान, असे काही घडले, ज्याबद्दल आता सर्वजण बोलत आहेत. खरं तर, १८ जानेवारीला दुपारी कर्णधार रोहित शर्मा निवडसमितीचे अध्यक्ष अजित आगरकरसोबत पत्रकार परिषदेत पोहोचला. मात्र, ही पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वीच या दोन्ही दिग्गजांच्या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रोहित शर्माला अशा काही गोष्टी बोलताना ऐकण्यात आले जे कदाचित कर्णधार कधीच सार्वजनिकपणे बोलला नसता. त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल –

रोहित शर्मा अजित आगरकरसह पत्रकार परिषदेला पोहोचला, तेव्हा त्याला माहीत नव्हतं की माईक चालू आहे. त्यामुळे तो अजित आगरकररांना म्हणाला, “आता मला सेक्रेटरीसोबत आणखी दीड तास बसावे लागेल. फॅमिलीबाबत चर्चा करायची आहे. कारण सगळे येऊन माझ्याजवळच बोलत आहेत.” या २० सेकंदाच्या व्हिडीओत रोहित शर्मा बीसीसीआने जारी केलेल्या १० कठोर नियमाबद्दल बोलत होता. जो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओबद्दल काही लोकांचा असाही विश्वास आहे की रोहित शर्माला माईक चालू आहे हे माहित होते आणि तो हे सर्व मुद्दाम सांगत होता.

Champions Trophy 2025: Indian Team Announced for Champions Trophy
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संघ जाहीर! उपकर्णधारपदी ‘या’ युवा खेळाडूची लागली वर्णी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Champions Trophy 2025 Team India Squad Fast bowler Mohammed Siraj was dropped
Champions Trophy 2025 : मोहम्मद सिराजला टीम इंडियातून डच्चू! रोहित शर्माने सांगितलं निवड न होण्यामागचं कारण
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
Anjali Damania
Anjali Damania : “धनंजय मुंडेंचा ताबडतोब राजीनामा घ्या”, अंजली दमानियांनी जोडला आणखी एक पुरावा; म्हणाल्या…
Sandeep Kshirsagar On Walmik Karad
Sandeep Kshirsagar : “वाल्मिक कराडपर्यंत तपास आला की तपास थांबतो, कारण…”, संदीप क्षीरसागर यांचा खळबळजनक आरोप
Champions Trophy 2025 India drop Sanju Samson and pick Rishabh Pant in 15 man squad
Champions Trophy 2025 : BCCI ने ५ पैकी ३ सामन्यात शतक झळकावणाऱ्या खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता! काय आहे कारण?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”

भारतीय क्रिकेट बोर्डाने संघातील स्टार कलचर संपवण्यासाठी १० कठोर नियम लागू केले आहेत, जे प्रत्येक खेळाडूने पाळणे अत्यंत आवश्यक आहे. यातील एक नियम खेळाडूंच्या कुटुंबाशीही संबंधित आहे. आता परदेश दौऱ्यांवर खेळाडू ४५ दिवसांपेत्रा जास्त काळ असेल, तर त्याचे कुटुंबीय फक्त दोन आठवडे सोबत राहू शकणार. याशिवाय खेळाडूंना मालिकेदरम्यान वैयक्तिक जाहिराती शूट करण्यासही बंदी घालण्यात आली आहे, जर एखाद्या खेळाडूने नियमांचे उल्लंघन केले तर त्याला कठोर शिक्षा केली जाईल.

हेही वाचा – Champions Trophy 2025 : संजू सॅमसनला विजय हजारे ट्रॉफीत न खेळल्याची मिळाली शिक्षा? शेवटच्या वनडेत झळकावलं होतं शतक

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी बीसीसीआयने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील १५ सदस्यीय भारतीय संघ जाहीर केला आहे. हाच संघ इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार आहे. या संघाच्या उपकर्णधारपदी युवा खेळाडू शुबमन गिलची वर्णी लागली आहे. त्याचबरोबर इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान जसप्रीत बुमराह खेळणार नसल्याने त्याच्या जागी हर्षित राणा खेळणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारताचा १५ सदस्यीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा.

Story img Loader