Rohit Sharma on team selected for the World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या स्पर्धेसाठी बीसीसीआयने १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियामध्ये अनुभवी खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले आहे. हार्दिक पांड्या टीम इंडियाचा उपकर्णधार असेल. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर हे देखील संघात आहेत. भारतीय संघ जाहीर करताना कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर काय म्हणाले जाणून घेऊया.

विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. श्रीलंकेतील कँडी येथील भारतीय संघाच्या हॉटेलमध्ये पत्रकार परिषद झाली. दरम्यान, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी संघाची घोषणा केली. अनफिट केएल राहुलची निवड संघात करण्यात आली आहे. आशिया चषकासाठी निवड झालेल्या तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा यांना संघात ठेवण्यात आलेले नाही.

IND vs IRE Smriti Mandhana and Pratika Rawal 233 run partnership broke a 20 year old record against Ireland
IND vs IRE : स्मृती-प्रतिकाच्या द्विशतकी भागीदारीने केला मोठा पराक्रम! मोडला २० वर्षांपूर्वीचा ‘हा’ खास विक्रम
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rishabh Pant to play Ranji Trophy after 7 years
टीम इंडियाचा ‘हा’ विस्फोटक फलंदाज ७ वर्षांनी रणजी ट्रॉफी खेळणार, जैस्वाल-गिलही देशांतर्गत सामने खेळण्यासाठी सज्ज
Rohit Sharma Practice With Mumbai Ranji Trophy Team at Wankhede Stadium
Rohit Sharma: रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत, हिटमॅनने घेतला मोठा निर्णय; मुंबई संघासह…
devendra fadnavis likely visit davos
दावोसमध्ये पुढील आठवड्यात जागतिक आर्थिक परिषद; सात लाख कोटींचे करार अपेक्षित
Gautam Gambhir Wants Yashasvi Jaiswal As Next India Captain After Rohit Sharma at loggerheads with Ajit Agarkar
India Next Captain: ऋषभ पंत नाही २३ वर्षीय युवा खेळाडू भारताचा भावी कर्णधार? कोचने केली निवड; गंभीर-आगरकरमध्ये मतभेद
Rohit Sharma to Play International Cricket Till Champions Trophy Unlikely play England Test Series According to Reports
Rohit Sharma: रोहित शर्मासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी अखेरची स्पर्धा? ‘या’ दिवशी अखेरचा सामना खेळण्याची शक्यता; मोठी अपडेट आली समोर
IPL 2025 Time Table
IPL 2025 : ठरलं! ‘या’ दिवसापासून रंगणार आयपीएलचा थरार, पहिला सामना ‘या’ तारखेला होणार

संघ निवडीवर काय म्हणाला रोहित शर्मा?

रोहित शर्मा म्हणाला, “वनडे क्रिकेटमध्ये तुमच्याकडे जास्त वेळ असतो. टी-२० मध्ये तुमच्याकडे रणनीती बनवायला किंवा नवीन योजनांचा विचार करायला वेळ नसतो. हे फक्त आमच्याबाबतीत नाही, तर प्रत्येक टीमबाबत आहे. प्रत्येक वर्ल्ड कपमध्ये असे घडते. काही खेळाडू संघात स्थान मिळवू शकत नाहीत. आम्हाला सर्वोत्तम संघ निवडायचा आहे आणि अशा परिस्थितीत आम्हाला कोणाला तरी संघाबाहेर ठेवावे लागेल.”

हेही वाचा – India World Cup 2023 Squad: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ जाहीर, वाचा काय आहे संपूर्ण संघ

फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये संघात खोली हवी –

रोहित शर्मा पुढे म्हणाला, “फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये संघात खोली हवी आहे. गेल्या काही वर्षात आमच्या संघात याची कमतरता आहे. अनेक प्रसंगी आम्हाला असे वाटले की आमच्या संघात फलंदाजीची खोली नाही. नवव्या, दहाव्या किंवा अकराव्या क्रमांकावरील खेळाडूंचे काम फक्त गोलंदाजी करणे नाही. अनेक प्रसंगी हे लोक १०-१५ धावा करतात, जे विजय आणि पराभव यातील फरक सिद्ध करते.”

मुख्य निवडकर्त्याने राहुल फिट असल्याचे सांगितले –

मुख्य निवडकर्ते अजित आगरकर म्हणाले, “आम्हाला दुखापतीच्या समस्या होत्या, पण श्रेयस आणि राहुल योग्य वेळी फिट झाले. अनेक नावांची चर्चा झाली, पण तुम्हाला संघाच्या संतुलनानुसार सर्वोत्तम संघ निवडायचा असतो. लोकेश राहुल चांग्या लयीत आहे.” तो बेंगळुरूमध्ये चांगला दिसत होता. पण आशिया चषकापूर्वी त्याला दुखापत झाली होती. याबाबत आशिया चषकापूर्वी सांगण्यात आले होते. ५० षटकांमध्ये तुम्हाला संघात ऑफस्पिनर हवा असतो, परंतु हा सर्वात संतुलित संघ आहे, आम्ही निवडलेल्या गोलंदाजांवर खूप आनंदी आहोत.

हेही वाचा – Asia Cup 2023: ”… हे फक्त जय शाहच स्पष्ट करू शकतात”; भारत-पाक सामना रद्द झाल्यानंतर नजम सेठींनी एसीसीच्या अध्यक्षावर साधला निशाणा

विश्वचषक २०२३ साठी भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव.

Story img Loader