Rohit Gambhir Prefers Suryakumar As India T20 Captain: टी-२० विश्वचषक विजयानंतर रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. रोहितच्या निवृत्तीनंतर भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार कोण असेल याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. उपकर्णधाराची भूमिका बजावणारा हार्दिक पंड्या कर्णधार असेल असे आधी बोलले जात होते. मात्र आता सूर्यकुमार यादवचे नाव समोर आले आहे. श्रीलंका दौऱ्यावरील टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर होईपर्यंत या चर्चा सुरूच असतील.

हेही वाचा – Natasa Stankovic: घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान नताशा स्टॅनकोविकने लेकासह सोडलं घर, एअरपोर्टवरील VIDEO आला समोर

हार्दिक पंड्या हा भारताच्या टी-२० संघाचे नेतृत्त्व करण्यासाठी प्रबळ दावेदार होता. पण त्याच्या सातत्याने होणाऱ्या दुखापती आणि फिटनेसच्या चिंतेमुळे तो फार काळ भारतीय संघाचे नेतृत्त्व करू शकणार नाही, त्यात जर दुखापत झाल्यास तो महत्त्वाच्या मालिकांनाही संघाबाहेर असू शकतो असं बीसीसीआयचं म्हणणं असल्याचे रिपोर्ट्समधून समोर आले आहे. एकदिवसीय विश्वचषक २०२३ नंतर थेट तो २०२४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत संघात सामील झाला. याआधीही तो दुखापतीमुळे अनेकदा संघाबाहेर होता. हार्दिकचे वर्कलोड मॅनेजमेंट हे संघासाठी मोठे आव्हान आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन सूर्यकुमार यादवचा कर्णधारपदासाठी विचार करत आहे.

हेही वाचा – Sri Lanka: धक्कादायक! श्रीलंकेच्या माजी कर्णधाराची हत्या, पत्नी आणि मुलांसमोर घरात झाडल्या गोळ्या

रोहित-गंभीरमुळे होणार सूर्यकुमार यादव भारताचा T20 Captain?

हार्दिक नाही तर सूर्यकुमार हा भारताच्या टी-२० संघाचा कर्णधा असेल अशी चर्चा सुरू आहे. या चर्चांदरम्यान आता नवनिर्वाचित मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि टी-२० विश्वचषक विजेता कर्णधार रोहित शर्मा यांनी कर्णधारपदासाठी सूर्यकुमार यादवला पहिली पसंती दर्शवली आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांनी या आधीच हार्दिक पंड्याबरोबर चर्चा केल्याचेही समोर आले आहे. बीसीसीआयला टी-२० विश्वचषक २०२६ पर्यंत कायमस्वरूपी एक कर्णधार हवा आहे, त्यासाठी आता सूर्यकुमारला पहिली पसंती दिली जात आहे, अशी माहिती टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे.

हेही वाचा – Olympic 2024: हॉटस्टार, फॅनकोड नाही तर… भारतात ‘या’ अ‍ॅपवर फ्री पाहता येणार ऑलिम्पिकचे लाईव्ह सामने, जाणून घ्या सविस्तर

कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवचा रेकॉर्ड


कर्णधार म्हणून सूर्याने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतही छाप पाडली. हार्दिकने १६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून १० सामने जिंकले आहेत, तर त्याला ५ पराभव पत्करावे लागले आहेत आणि १ सामना अनिर्णित राहिला. सूर्यकुमार यादवने ७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी पाच सामने जिंकले आहेत, तर दोन सामन्यांमध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे.