Rohit Sharma Baby Boy Name Ahaan : भारतीय एकदिवसीय आणि कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा नुकताच दुसऱ्यांदा बापमाणूस झाला आहे. १५ नोव्हेंबर रोजी रोहितची पत्नी रितिकाने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. आता या जोडप्याने आपल्या दुसऱ्या मुलाचे नावही ठेवले आहे. रोहित आणि रितिका यांनी आपल्या मुलाचे नाव ‘अहान शर्मा’ ठेवले आहे. रोहितची पत्नी रितिका हिने स्वत: तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करून ही माहिती दिली आहे.

रोहित आणि रितिकाला एक मुलगी आहे, तिचे नाव समायरा आहे. समायराचा जन्म २०१८ मध्ये ३० डिसेंबर रोजी झाला होता. शनिवारी तिचा सहावा वाढदिवस साजरा करण्यात आला. रोहित आणि रितिका यांचे २०१५ मध्ये लग्न झाले होते. आता आपण या जोडप्याने अहानच नाव का ठेवले? आणि या शब्दाचा अर्थ काय आहे? जाणून घेऊया.

‘अहान’ चा अर्थ काय?

अहान हे नाव संस्कृत शब्द ‘अहा’ पासून आले आहे. याचा अर्थ ‘जागणे’ असा होतो. आहान नावाचा अर्थ पहाट, सूर्योदय, प्रकाशाचा पहिला किरण, मॉर्निंग ग्लोरी इ. या नावाची व्यक्ती नेहमी शिकण्याचा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करेल.

हेही वाचा – Shubman Gill : शुबमन गिल आणि अभिषेक नायर यांच्यातील पैजेचा VIDEO व्हायरल, कोणी मारली बाजी? जाणून घ्या

रोहित शर्मा पर्थ कसोटीला मुकला होता –

अहानच्या जन्मामुळे रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीचा भाग होऊ शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहने पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत भारताचे नेतृत्व केले. टीम इंडियाने पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा एकतर्फी पराभव केला. यजमानांनी पहिली कसोटी २९५ धावांच्या मोठ्या फरकाने गमावली.

हेही वाचा – Marco Jansen : मार्को यान्सनने ११ विकेट्स घेत घडवला इतिहास, भारतीय दिग्गजाचा मोडला २८ वर्ष जुना विक्रम

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा हा सर्वात मोठा कसोटी विजय ठरला. पाच सामन्यांच्या या रोमांचक कसोटी मालिकेत भारत आता १-० ने आघाडीवर आहे. दुसरी कसोटी ॲडलेडमध्ये खेळवली जाईल. दुसरा कसोटी सामना गुलाबी चेंडूने दिवस-रात्र खेळला जाणार आहे. भारताने शेवटचा दिवस-रात्र कसोटी सामना २०२२ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. दुसऱ्या कसोटीत रोहित शर्मा पुन्हा एकदा टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.