Rohit Sharma’s Lamborghini Car Video Viral: सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा कसोटी आणि वनडे मालिके संपल्यानंतर मुंबईत परतला आहे. रोहित शर्मा वेस्ट इंडिज दौऱ्यावर कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून दिसला होत. आता भारतीय कर्णधार ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकाची तयारी सुरू करणार आहे. दरम्यान, मुंबईत तो पत्नी रितिकासोबत लॅम्बोर्गिनीमधून फिरताना दिसला.

रोहित शर्मा त्याची पत्नी रितिका सजदेहसोबत ४.२ कोटींच्या आलिशान कारमध्ये दिसला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये रोहित शर्मा लॅम्बोर्गिनीमधून खाली उतरताना दिसत आहे. यानंतर त्यांची पत्नी रितिका गाडीतून खाली उतरताना दिसत आहे. यावेळी भारतीय कर्णधाराची एक झलक पाहण्यासाठी अनेक चाहते घटनास्थळी उपस्थित होते.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
maha kumbha mela 2025 khoya paya kendra funny video
VIDEO : “ऐ राजू, हम ढूंढ रहे है रे बाबू…”, महाकुंभ मेळ्यात हरवलेल्या लोकांसाठी होतायत अशा घोषणा की, ऐकून पोट धरून हसाल
Brides entry in her wedding day
VIDEO: “आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी” लग्नात नवरीची जबरदस्त एन्ट्री; धमाकेदार डान्स पाहून सारेच जण चकित
Sam Konstas Fan Crashes His Car While Trying to Take with Australian Opener Video Goes Vira
VIDEO: सॅम कॉन्स्टासला भेटण्यासाठी चाहत्याने केली घोडचूक, चालत्या गाडीतूनच उतरला अन्…
Rohit sharma starts training ahead of england and Champions Trophy running at the BKC in Mumbai video goes viral
Rohit Sharma : रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सुरु केला सराव, मुंबईतील बीकेसीत धावतानाचा VIDEO व्हायरल
Shiva
Video : “ही लग्नाची पत्रिका…”, शिवाला आशूच्या लग्नाचे आमंत्रण मिळणार अन्….; पाहा मालिकेचा प्रोमो
Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ

रोहित शर्माने गेल्या वर्षी मार्चमध्ये लक्झरी लॅम्बोर्गिनी उरूस खरेदी केली होती. रोहित शर्माला गाड्यांची खूप आवड आहे. लॅम्बोर्गिनीशिवाय त्याच्याकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. वृत्तानुसार, भारतीय कर्णधाराच्या कार कलेक्शनमध्ये निळ्या रंगातील बीएमडब्ल्यू एम-५ देखील आहे. दुसरीकडे, लॅम्बोर्गिनी उरूसबद्दल बोलायचे तर, ही केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील प्रसिद्ध कारांपैकी एक आहे. ही लक्झरी कार जगभरातील लोकांना खूप आवडते.

हेही वाचा – IND vs WI: चौथ्या टी-२० सामन्यासाठी टीम इंडिया मियामीत दाखल, बीसीसीआयने शेअर केला खेळाडूंचा खास VIDEO

आशिया कप २०२३ च्या माध्यमातून भारतीय कर्णधार पुन्हा एकदा अॅक्शनमध्ये दिसणार आहे. आशिया कपमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना २ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. या दोघांमधीला हा शानदार सामना श्रीलंकेतील कँडी येथे होणार आहे. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सामन्यातून भारतीय संघातील अनेक स्टार खेळाडू पुनरागमन करणार आहेत. याआधी २०२२ आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने गट टप्प्यात भारत-पाक सामन्यात भारताने बाजी मारली होती. मात्र, सुपर-4 टप्प्यात टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.

Story img Loader