Most Duck Out In Indian Premier League History : क्रिकेटच्या तमाम चाहत्यांना आयपीएलचे सामने पाहण्याचे वेध लागले असून त्यांची प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे. कारण ३१ मार्च २०२३ पासून यंदाच्या आयपीएलच्या १६ व्या पर्वाचे रंगतदार सामने सुरु होणार आहेत. तत्पुर्वी आयपीएलच्या इतिहासात कोणत्या फलंदाजांनी अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे, तसंच कोणते पाच खेळाडू सर्वाधिक वेळा डक आऊट झाले आहेत, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात सर्वाधिक वेळा डक आऊट होण्याचा विक्रम भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि मनदीप सिंगच्या नावावर आहे. दोन्ही दिग्गज फलंदाज आयपीएलमध्ये १४ वेळा शून्यावर बाद झाले आहेत. तसंच पीयुष चावला, हरभजन सिंग आणि पार्थिव पटेल यांचाही या लिस्टमध्ये समावेश आहे. मनदिप सिंगने आयपीएलमध्ये १०८ सामने खेळले आहेत. यापैकी ९५ सामन्यांमध्ये मनदीप १४ वेळा डक आऊट झाला आहे. तसंच रोहित शर्माही डक आऊटच्या लिस्टमध्ये अव्वल स्थानी आहे. रोहितने आयपीएलमध्ये २२७ सामने खेळले आहेत. यापैकी २२२ सामन्यात रोहितने ५८७९ धावा कुटल्या आहेत. आयपीएलमध्ये रोहित १४ वेळा शून्यावर बाद झाला आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा डक आऊट होण्याच्या लिस्टमध्ये पीयूष चावला तिसऱ्या स्थानावर आहे. पीयूषने आयपीएलमध्ये एकूण १६५ सामने खेळले आहेत. याचदरम्यान पीयूष १३ वेळा शून्यावर बाद झाला आहे. तर हरभजन सिंग या लिस्टमध्ये चौथ्या क्रमांकावर असून आयपीएलमध्ये त्याने एकूण १६३ सामने खेळले आहेत. याचदरम्यान हरभजन १३ सामन्यांमध्ये डक आऊट झाला आहे. पार्थिव पटेल पाचव्या स्थानावर असून त्याने आयपीएलमध्ये एकूण १३९ सामने खेळले आहेत. याचदरम्यान तो १३ वेळा शून्यावर बाद झाला आहे.