Rohit Sharma and Pat Cummins created history: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील डब्ल्यूटूीसीचा फायनल सामना लंडनमधील ओव्हल येथे खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांमध्ये खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारांनी एक अनोखा विक्रम रचून इतिहास रचला आहे. या सामन्यात रोहित शर्मा आणि पॅट कमिन्स यांनी असा पराक्रम केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोन्ही संघांचे कर्णधार ५० वा सामना एकत्र खेळण्याची ही पहिलीच वेळ –

खरंतर हा सामना रोहित शर्मा आणि पॅट कमिन्सचा ५० वा कसोटी सामना आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दोन्ही संघांचे कर्णधार ५० वा सामना एकत्र खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी असा योगायोग आजपर्यंत घडू शकला नाही. याशिवाय कसोटी क्रिकेटसाठीही हा टप्पा खूप मोठा आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा आणि पॅट कमिन्स या दोन्ही कर्णधारांसाठी हा सामना खूप खास आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा हा सामना जिंकून दोन्ही खेळाडूंना त्यांचा ५० वा सामना संस्मरणीय बनवायचा आहे. जो आजपर्यंतच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कधीही घडला नाही. अशी कामगिरी करणारे दोघेही पहिले खेळाडू ठरले आहेत.

कसोटी सामन्यातील दोन्ही कर्णधारांची आकडेवारी –

रोहित शर्माने ४९ कसोटीत ४५.६६च्या सरासरीने ३३७९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १४ अर्धशतके, ९ शतके आणि १ द्विशतक झळकावले आहे. रोहितची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या २१२ आहे. रोहितची कसोटीतील कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सबद्दल बोलायचे, तर त्याने ४९ सामन्यात २१.५१ च्या सरासरीने २१७ विकेट घेतल्या आहेत. त्याच वेळी, त्याने ८ वेळा पाच विकेट्स आणि एकदा १० विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. कमिन्सची कसोटी सामन्यातील कामगिरीही चांगली आहे. अशा स्थितीत या सामन्यात दोघांमध्ये जबरदस्त सामना पाहायला मिळू शकतो.

हेही वाचा – ODI WC 2023:पाकिस्तानने आयसीसीसमोर ठेवली नवी अट; पीसीबी अध्यक्ष नजम सेठी म्हणाले, “नरेंद्र मोदी स्टेडियमवर…”

सामन्याबद्दल बोलायचे, तर नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ८५ षटकांनंतर ३ बाद ३२३ धावा केल्या आहेत. सध्या खेळपट्टीवर ट्रॅव्हिस हेड (१४६) आणि स्टीव्ह स्मिथ (९१) धावांवर खेळत आहे. तत्पुर्वी उस्मान ख्वाजा (०) आणि डेव्हिड वार्नर ४३ धावांवर बाद झाला. ते मार्नस लाबूशेन २६ धावांचे योगदान देऊन बाद झाला. भारताकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकुरने प्रत्येकी १-१ विकेट घेतली. बाद झालेल्या तिन्ही फलंदाजांचे झेल यष्टिरक्षक श्रीकर भरतने टिपले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma and pat cummins have created history by playing their 50th test match in the wtc final 2023 vbm