Rohit Sharma and Pat Cummins pose for a photo session at Adalaj stepwell: एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि भारत आमनेसामने असणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांनी फोटो सेशन केले. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स यांनी अहमदाबादमधील ऐतिहासिक वारसास्थळावर ट्रॉफीसोबत फोटो सेशन केले.
ही ट्रॉफी कोणाकडे जाणार याचा निर्णय रविवारी होणार आहे. ऑस्ट्रेलियाने पाचवेळा विश्वचषक जिंकला आहे, तर टीम इंडियाने दोनदा हे विजेतेपद पटकावले आहे. विश्वचषकाच्या इतिहासात दुसऱ्यांदा भारत आणि ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. गेल्या वेळी २००३ मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला हरवून विजेतेपद पटकावले होते.
रोहित आणि कमिन्सने अहमदाबादमधील ‘अडालज की बावडी’ या ठिकाणी फोटोशूट केले. हे उकरार, अहमदाबाद येथे आहे. ती राणी रुदादेवीने आपल्या पतीच्या स्मरणार्थ बांधली होती. राणी रुदादेवी वाघेला राज्याचा प्रमुख वीरसिंहाची पत्नी होती. त्यावेळी हा परिसर दांडाई देश म्हणून ओळखला जात असे. त्यांच्या साम्राज्यात नेहमीच पाण्याची टंचाई असायची आणि त्यांना पावसावर अवलंबून राहावे लागायचे. ‘अडालज की बावडी’ हे गुजरातच्या मुख्य आकर्षण केंद्रांपैकी एक आहे. यासह, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे संरक्षित आहे. ‘बावडी’चा म्हणजे विहीरीचा आकार अष्टकोनी असून तो इमारतीच्या स्वरूपात बांधण्यात आला आहे. हिंदू-इस्लामी हस्तकलेचे हे अप्रतिम उदाहरण आहे.
या विहिरीच्या आतील तापमान नेहमी बाहेरील तापमानापेक्षा सहा अंश कमी असते. राणा वीर सिंह यांनी आपल्या प्रजेच्या सोयीसाठी या विहिरीचे बांधकाम सुरू केले होते. मात्र, मध्येच सुलतान बेघराने राणा वीर सिंगच्या राज्यावर हल्ला केला आणि या लढाईत राणा वीर सिंगचा मृत्यू झाला. यानंतर सुलतान बेघराने राणीच्या सौंदर्याने आकर्षित होऊन लग्नाचा प्रस्ताव पाठवला. राणीने त्याला मुत्सद्देगिरीच्या जाळ्यात अडकवले आणि त्याच्यापुढे विहिरीचे बांधकाम पूर्ण करण्याची अट घातली. सुलतानने पायरी विहिरीचे बांधकाम पूर्ण केले, परंतु राणीने त्याच विहिरीत उडी मारून आपल्या प्राणाची आहुती दिली.
हेही वाचा – IND vs AUS Final: भारतीय क्रिकेटपटूंच्या मनगटावर असलेले ‘हे’ डिव्हाइस काय आहे? जाणून घ्या सर्वकाही सविस्तर
अडालज पायऱ्यांच्या विहिरीचा इतिहास जरी दु:खाचा असला, तरी या विहिरीने जलव्यवस्थापनात अतुलनीय योगदान दिले आहे. असे मानले जाते की गावकरी येथे पाणी नेण्यासाठी आणि देवी-देवतांची पूजा करण्यासाठी येत असत. या पायरीच्या शेजारी त्या मजुरांच्या कबरी आहेत, ज्यांची सुलतानने विहीर बांधल्यानंतर हत्या केली होती. अशी अप्रतिम विहीर इतर कोणी बांधू नये, असे सुलतानाला वाटत होते.