विंडीजविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने भारताने 195 धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार रोहित शर्माने केलेलं शतक व त्याला शिखर धवनने दिलेली साथ या जोरावर भारताने विंडीजसमोर मोठं आव्हान ठेवलं. दरम्यान सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत असताना रोहित-शिखर जोडीने एका अनोख्या विक्रमाची नोंद आपल्या नावे केली आहे. हिटमॅन-गब्बरची ही जोडी टी-20 क्रिकेटमधली सर्वात यशस्वी जोडी ठरली आहे. भारतीय डावातल्या पहिल्या 10 धावा काढल्यानंतर रोहित-शिखर जोडीने आपल्या खात्यात हा विक्रम जमा केला. आजचा सामना सुरु होण्याआधी भारतीय जोडीच्या नावावर 1145 धावा जमा होत्या. आजच्या सामन्यात भारतीय जोडीने डेव्हिड वॉर्नर आणि शेन वॉटसन जोडीचा 1154 धावांचा विक्रम मागे टाकला.
दुसरा सामना सुरु होण्याआधी रोहित-शिखर जोडी ही तिसऱ्या क्रमांकावर होती. या खेळीदरम्यान भारतीय जोडीने न्यूझीलंडच्या मार्टीन गप्टील आणि केन विल्यमसन जोडीचा 1151 धावांचा विक्रम मागे टाकत पहिलं स्थान पटकावलं. 2013 पासून शिखर-रोहित टी-20 क्रिकेटमध्ये सलामीला यायला लागले. त्यावेळपासून आतापर्यंत या जोडीने केलेल्या भागीदारीत 2 शतकं आणि 4 अर्धशतकी भागीदाऱ्यांचाही समावेश आहे. आतापर्यंत या जोडीने 30.13 च्या सरासरीने धावा काढल्या आहेत.
अवश्य वाचा – IND vs WI : रोहित शर्माने मोडला विराटचा विक्रम
दरम्यान, विंडीजविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने फलंदाजीतील लय कायम राखत एक नवा विक्रम केला. त्याने फलंदाजी करताना आवश्यक ११ धावा पूर्ण केल्या आणि विराटचा विक्रम मोडीत काढला. आवश्यक ११ धावा करत त्याने टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज होण्याचा मान मिळवला.