Rohit Sharma and Yashasvi Jaiswal centuries: कर्णधार रोहित शर्मा आणि युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल यांच्या शतकांमुळे भारताने डॉमिनिका कसोटीत आपली पकड मजबूत केली आहे. गुरुवारी (१३ जुलै) सामन्याच्या दुसऱ्या दिवशी खेळ संपला तेव्हा त्याने पहिल्या डावात दोन गडी बाद ३१२ धावा केल्या आहेत. टीम इंडियाकडे १६२ धावांची आघाडी आहे. यशस्वी जैस्वाल नाबाद १४३ आणि माजी कर्णधार विराट कोहली ३६ धावांवर नाबाद आहे. आता तिसर्‍या दिवशी यशस्वी आपल्या शतकाचे द्विशतकात रूपांतर करण्यासाठी उतरेल. दुसरीकडे विराट कोहलीला देखील मोठी खेळी करायला आवडेल.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, गुरुवारी (१३ जुलै) टीम इंडियाने पहिल्या दिवसाची धावसंख्या पहिल्या डावात ८० धावांपर्यंत मजल मारली. यशस्वीने शतक झळकावून अनेक विक्रम केले. त्याचवेळी रोहित शर्माने गेल्या काही डावातील निराशा मागे टाकत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नागपूर कसोटीत शतक केल्यानंतर मोठी खेळी खेळली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी २२९ धावांची भागीदारी केली. भारताच्या कसोटी इतिहासात टीम इंडियाने एकही विकेट न गमावता विरोधी संघाविरुद्ध पहिल्या डावात आघाडी घेण्याची ही पहिलीच वेळ होती. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात १५० धावा केल्या होत्या.

How India lost in Test matches against New Zealand Where exactly did the Indian team go wrong
रोहित, विराट सुमार; युवकांतही सातत्याचा अभाव! भारतीय संघाचे नेमके चुकले कुठे?ऑस्ट्रेलियाविरुद्ध कितपत सज्ज?
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
Rohit Sharma Statement Rishabh Pant Controversial Wicket in IND vs NZ Mumbai test said The bat was close to the pads
IND vs NZ: “सर्वांसाठी सारखेच नियम ठेवा…”, ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर रोहित शर्मा भडकला, खरंच पंत नॉट आऊट होता?
Rohit Sharma Statement on India Series Defeat IND vs NZ Said I wasnt at my best with both bat and as a captain
IND vs NZ: “एक कर्णधार व फलंदाज म्हणून मी…”, भारताच्या दारूण पराभवानंतर रोहित शर्माचं भावुक वक्तव्य; व्हाईट वॉशचं खापर कोणावर फोडलं?
IND vs NZ India suffered their first-ever home series whitewash in a three-match Test series, losing the third Test at the Wankhede Stadium in Mumbai by 25 runs on Sunday
IND vs NZ : टीम इंडियाचा सलग तिसऱ्या सामन्यात लाजिरवाणा पराभव! न्यूझीलंडने व्हाइट वॉश करत भारतात घडवला इतिहास
Shubman Gill Overtakes Cheteshwar Pujara
Shubman Gill : शुबमन गिलने चेतेश्वर पुजाराला मागे टाकत केली खास कामगिरी, रोहित शर्माच्या स्पेशल क्लबमध्ये झाला सामील
Virat Kohli Broke Sachin Tendulkar World Record of Most Runs After First 600 Innings in International Cricket
Virat Kohli: ४ धावांवर धावबाद झाल्यानंतरही विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज
IND vs NZ India Lost 3 Wickets in Just 9 Balls Yashasvi Jaiswal Bowled Virat Kohli Suicidal Run Out on Day 1 of Mumbai test
IND vs NZ: ९ चेंडूत ३ विकेट्स आणि टीम इंडियाची हाराकिरी, रोहित-विराटने पुन्हा केलं निराश

रोहितने १०वे शतक ठोकले

रोहित शर्माने कारकिर्दीतील १०वे शतक झळकावले. शतक झळकावून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. रोहितने २२१ चेंडूत १०३ धावा केल्या. यादरम्यान त्याने १० चौकार आणि २ षटकार मारले. अ‍ॅलिक अथेनेझने रोहितला बाद केले. त्याच्यानंतर फलंदाजीसाठी क्रीझवर आलेल्या शुबमन गिलला विशेष काही करता आले नाही आणि तो सहा धावा करून वॅरिकनचा बळी ठरला. यशस्वीने गिलची जागा घेतली आणि स्वतः तिसऱ्या क्रमांकावर उतरला. सध्याच्या घडीला पहिल्या डावात त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला आहे.

रोहित शर्मा आणि यशस्वी यांनी ४५० हून अधिक चेंडूंचा सामना केला

भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी मिळून एकूण ४५४ चेंडूंचा सामना केला. भारतीय सलामीच्या जोडीने एका डावात सर्वाधिक चेंडूंचा सामना करण्याच्या बाबतीत मुरली विजय आणि शिखर धवन यांना मागे टाकले. विजय आणि धवनने २०१५ मध्ये बांगलादेशविरुद्ध फतुल्ला येथे ४०७ चेंडूत एकही विकेट पडू दिली नाही. वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड या जोडीने २००६ मध्ये लाहोरमध्ये पाकिस्तानविरुद्ध ४६१ चेंडूंचा सामना केला होता. यामध्ये रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल यांची जोडी अव्वल स्थानावर आहे. दोघांनी २०१९ मध्ये विशाखापट्टणम येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४९२ चेंडू खेळले होते.

सहाव्यांदा भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी परदेशात एका डावात शतक झळकावले

१९३६ विजय मर्चंट आणि मुश्ताक अली इंग्लंड, ओल्ड ट्रॅफर्ड

१९८५-८६ सुनील गावसकर आणि के. श्रीकांत ऑस्ट्रेलिया, सिडनी

२००६ वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड पाकिस्तान, लाहोर

२००७ वसीम जाफर आणि दिनेश कार्तिक बांगलादेश, मीरपूर

२०१६ मुरली विजय आणि शिखर धवन बांगलादेश, फतुल्ला

२०२३ यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा वेस्ट इंडिज, डॉमिनिका

हेही वाचा: Yashasvi Jaiswal Century: पदार्पणात शतक ठोकत यशस्वी जैस्वालने रचला इतिहास! अनेकांचे विक्रम मोडत संपवली ‘दादा’ गिरी

रोहित-यशस्वी यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध इतिहास रचला

रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल ही सलामीची जोडी वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक धावांची भागीदारी करणारी भारतीय जोडी ठरली. दोघांनी सेहवाग आणि संजय बांगरचा रेकॉर्ड तोडला. बांगर आणि सेहवाग या जोडीने २००२ मध्ये मुंबईत २०१ धावांची भागीदारी केली होती. सेहवाग आणि जाफर यांनी २००६ मध्ये ग्रॉस आयझेल येथे १५९ धावा केल्या होत्या. १९७८ मध्ये सुनील गावसकर आणि चेतन चौहान यांनी मुंबईत १५३ धावांची भागीदारी केली होती. त्याच वेळी, १९७६ मध्ये गावसकर आणि अंशुमन गायकवाड या जोडीने किंग्स्टनमध्ये १३६ धावांची भर घातली होती.

हेही वाचा: IND vs WI: ‘यशस्वी’ भव: जैस्वालचे धडाकेबाज शतक! ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय सलामीवीर

वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय सलामीची सर्वात मोठी भागीदारी

२०९* – रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल, रॉसियो, २०२३

२०१ – वीरेंद्र सेहवाग आणि संजय बांगर, मुंबई वानखेडे, २००२

१५९ – वीरेंद्र सेहवाग आणि वसीम जाफर, ग्रॉस आइलेट, २००६

१५३ – सुनील गावसकर आणि चेतन चौहान, मुंबई वानखेडे, १९७८

१३६- सुनील गावसकर आणि अंशुमन गायकवाड, किंग्स्टन, १९७६