IND vs ENG 2nd ODI Updates in Marathi: भारत वि इंग्लड दुसरा वनडे सामना कटकमध्ये खेळवला जात आहे. या सामन्याची नाणेफेक जिंकत इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताला या सामन्यात झटपट विकेट मिळवता आल्या नसल्या तरी संघाने धावांवर अंकुश ठेवण्याचा चांगला प्रयत्न केला. पण हर्षित राणाने नको तिथे मोठी चूक केली आणि मैदानात सर्वच जण अवाक् झाले. तर रोहित शर्मा त्याच्यावर संतापलेला दिसला, पण नेमकं काय घडलं, जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंग्लंडच्या डावातील ३२ वे षटक टाकण्याची जबाबदारी हर्षित राणाकडे होते. हर्षित राणाने पहिल्याच चेंडूपासून चांगली गोलंदाजी केली. पहिल्याच चेंडूवर बटलर गडबडला होता. अशारितीने पहिल्या चार चेंडूवर एकही धाव हर्षितने दिली नाही. पाचवा चेंडू हर्षितने टाकला आणि त्याने तो चेंडू डिफेंड केला, धाव घेण्यासाठी बटलर पुढे आला आणि हर्षितच्या हातात चेंडू गेल्याचे पाहून तो मागे गेला, पण इथेच हर्षितने चूक केली.

हर्षित राणाच्या हातात चेंडू येताच त्याने बटलरच्या विकेटच्या दिशेने अचानक थ्रो केला, त्याआधीच बटलर पण जागेवर पोहोचला होता. पण चेंडू थेट राहुलच्या मागे चौकारासाठी गेला. जो चेंडू डॉट बॉल होणार होता तिथे हर्षितने आपल्या चुकीमुळे विनाकारण ४ धावा इंग्लंडला दिल्या.

हर्षितच्या विनाकारण थ्रोमुळे ४ धावा गेलेल्या पाहून रोहित शर्मा चांगलाच संतापला. रोहित त्याला इशारा करत म्हणाला, “डोकं कुठे आहे रे तुझं, काय भाई?” रोहितच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. तर हर्षित राणाला आपली चूक कळल्याने तो रोहितशी काहीच न बोलता रनअप घेण्यासाठी निघून गेला. चौकार जाताना पाहून भारताचे इतर खेळाडूही चकित झाले. सीमारेषेवरून हार्दिक पंड्या हातवारे करून काय करतोय म्हणलाा, तर रवींद्र जडेजाने तर हाताने तोंडचं लपवलं. हर्षित राणाचा थ्रो बघून राहुलला कळलंच नाही की याने थ्रो का केला होता.

यापूर्वी हर्षितने ३० व्या षटकात संघाला मोठी विकेट मिळवून दिली होती. हॅरी ब्रुक आणि जो रूट यांनी चांगली भागीदारी रचत संघाचा डाव पुढे नेत होते. पण हर्षितने चौथ्या चेंडूवर हॅरी ब्रुकला झेलबाद करत भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला. शुबमन गिलने मागे धावत जाऊन एक उत्कृष्ट झेल टिपला.