Rohit Sharma Press Conference IND vs AUS Melbourne Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी २६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्याआधी मेलबर्नमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माची पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषदेत रोहित शर्माने अनेक प्रश्नांची उत्तर दिली, पण यादरम्यान विराट कोहलीच्या प्रश्नावर त्याने चांगलंच उत्तर दिलं आहे.
पत्रकार परिषदेत रोहितला विराट कोहलीच्या बाद करण्याच्या पद्धतीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नालाही सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियात विराट बाहेरच्या बाजूला जाणाऱ्या चेंडूवर आऊट होत आहे. रोहितला याबाबत प्रश्नही विचारण्यात आला. रोहित शर्माच्या उत्तराने मात्र सर्वांचं लक्ष वेधलं.
विराट कोहली ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडू खेळून त्यावर बाद होण्याबाबत रोहित शर्माला विचारले असता, भारतीय कर्णधार आधी हसला. हसत हसत त्याने आपल्या शैलीत उत्तर दिल. रोहित शर्मा म्हणाला की, “आताच तुम्ही म्हणालात विराट कोहली हा आधुनिक काळातील महान खेळाडू आहे. मग आधुनिक काळातील महान खेळाडू या समस्येवर मात करत त्यातून मार्ग काढेल.”
विराट कोहलीने सध्याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आतापर्यंत खेळलेल्या ५ डावांमध्ये १२६ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने पर्थ कसोटीत दुसऱ्या डावात शतक झळकावले होते. तर उर्वरित ४ डावात त्याने केवळ २६ धावा केल्या आहेत. त्या ४ डावांमध्ये तो बहुतेक वळेस बाहेर जाणाऱ्या चेंडूंवर बाद झाला आहे. म्हणजे त्याचे बहुतेक झेल विकेटच्या मागे घेतले गेले आहेत.
हेही वाचा – Vinod Kambli: विनोद कांबळींच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी, मोफत उपचार करण्याचा रुग्णालयाचा निर्णयहेही वाचा –
विराट कोहलीच्या विषयानंतर रोहित शर्माने त्याच्या दुखापतीबाबत अपडेट देत तो पूर्णपणे फिट असल्याचे सांगितले. मेलबर्न कसोटीपूर्वी सराव करताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. रोहित शर्माला पुन्हा एकदा पत्रकार परिषदेत रोहित कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार हा प्रश्न विचारला गेला तेव्हा रोहित शर्माने कोण कुठे फलंदाजी करणार यावर वैतागत उत्तर दिले.
हेही वाचा – IND vs AUS: टीम इंडियात अश्विनच्या निवृत्तीनंतर मोठा बदल, मुंबई क्रिकेट संघाच्या ‘या’ खेळाडूला दिली संधी
पर्थ कसोटीनंतर भारतीय संघात परतल्यावर रोहित शर्माने ६व्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे, पण तो या क्रमांकावर फारशी चांगली फलंदाजी करू शकला नाही. रोहित शर्मा फलंदाजी क्रमावर बोलताना म्हणाला, “त्याची चर्चा आता नकोच. मला वाटतं कोण कुठे फलंदाजी करणार? हे आम्हाला आमच्यात ठरवायचं आहे. प्रत्येक पत्रकार परिषदेत चर्चा केली पाहिजे असा मुद्दा नाहीय. संघाला फायदा होईल यासाठी जे काही बदल आवश्यक असतील ते आम्ही करू.”