Rohit Sharma Viral Video of Exchanging Bells IND vs BAN: चेन्नई कसोटीच्या चौथ्या दिवशी पहिल्याच सत्रात भारतीय संघाच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेश संघाने गुडघे टेकले. भारताने दिलेल्या ५१३ धावांच्या मोठ्या लक्ष्यासमोर बांगलादेशचा संघ २३४ धावा करत सर्वबाद झाला. भारताचा सर्वात्कृष्ट फिरकीपटू अश्विनच्या ६ विकेट्सच्या जोरावर भारताने शानदार विजय मिळवला. पण या सामन्याची खेळपट्टी खूपच अवघड होती. कधी धावांसाठी तर कधी विकेटसाठी संघाला प्रतिक्षा करावी लागत होती. यादरम्यानत रोहित शर्माचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.
रोहित शर्मा मैदानावर खेळाडू नीट क्षेत्ररक्षण करत नसतील तर त्यांना ओरडताना दिसतो. फिल्ड सेट करत असताना अनेकांना ओरडतानाचा त्याचे व्हीडिओही आपण पाहिले आहेत. पण रोहित शर्मा स्वत ही खूप मजा मस्ती करत सामना खेळतो. बांगलादेशविरूद्ध सामन्यादरम्यानचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असताना ५६ व्या षटकादरम्यान रोहित शर्मा स्टंपवरील बेल्सची अदलाबदली करताना दिसला.
रोहित शर्मा व्हायरल व्हीडिओ
५७ वे षटक सुरू होण्यापूर्वी रोहित शर्मा स्टंपजवळ पोहोचला आणि त्याने बेल्सची अदलाबदली केली. इतकंच नव्हे तर रोहित शर्मा स्लिपमध्ये जाऊन त्याच्या जागी उभा राहिला आणि तिथून त्याने जादू केल्यासारख केलं आणि छू मंतर असं म्हणत अॅक्शन केली. रोहित शर्माचा हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर चाहते गंमतीने रोहितने जादू केली असं म्हणत आहेत. अनेक चाहत्यांनी यावर कमेंट केल्या आहेत. याआधीही विराट कोहलीचा अशा प्रकारे बेल्सची अदलाबदली करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सर्वात आधी स्टुअर्ट ब्रॉडने ही ट्रीक अॅशेस सामन्यात केली होती आणि मग संघाला विकेटही मिळाली.
रोहित शर्माने ५७ वे षटक सुरू होण्यापूर्वी बेल्सची अदलाबदली केली आणि त्यानंतर ५८ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर रविचंद्रन अश्विनने भारताला सातवी विकेट मिळवू दिली. अश्विनने मेहदी हसन मिराजला जडेजाकरवी झेलबाद करत सामन्यातील पाचवी विकेट मिळवली.
सामनावीर ठरलेल्या रविचंद्रन अश्विन, शुबमन गिल आणि ऋषभ पंत यांनी शतके झळकावली, तर रवींद्र जडेजाने पहिल्या डावात शानदार फलंदाजी करत ८६ धावा केल्या. भारताने पहिल्या डावात ३७६ धावा केल्या होत्या, तर दुसरा डाव ४ बाद २८७ धावांवर घोषित केला होता. बांगलादेशने पहिल्या डावात १४९ धावा तर दुसऱ्या डावात २३४ धावा केल्या होत्या. यासह भारतीय संघाने २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघांमधील मालिकेतील दुसरी कसोटी २७ सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीनपार्क क्रिकेट स्टेडियमवर खेळवली जाणार आहे.