Rohit Sharma Became First Captain to Achieve Historic Feat IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या चेन्नई कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत भारतीय कर्णधार रोहित शर्मा धावा करण्यात अपयशी ठरला. रोहितने पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात ५ धावा केल्या. अर्थात रोहित दुसऱ्या डावात ५ धावा करत बाद झाला पण २०२४ मध्ये त्याने एक विशेष स्थान मिळवले आणि अशी कामगिरी करणारा तो पहिला कर्णधार ठरला, याबरोबर रोहितने सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा एक कामगिरी आपल्या नावे केली आहे.
रोहितने केली द्रविड-तेंडुलकरची बरोबरी
रोहित शर्मा २०२४ मध्ये कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. तथापि, भारतीय कर्णधार म्हणून, त्याने दोन वेळा एका वर्षात १००० किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा पराक्रम केला आणि द्रविड आणि तेंडुलकरच्या बरोबरीने आला. कर्णधार म्हणून, या दोन्ही खेळाडूंनी एका कॅलेंडर वर्षात १००० किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा विक्रम केला होता. या यादीत पहिला क्रमांक एमएस धोनीचा आहे, ज्याने कर्णधार म्हणून एका कॅलेंडर वर्षात ७ वेळा १००० किंवा त्याहून अधिक धावा केल्या होत्या.
हेही वाचा – VIDEO: “ओए, सगळेजण झोपलेत का…”, भडकलेल्या रोहितने मैदानात खेळाडूला घातली शिवी, स्टंप माईकमध्ये आवाज रेकॉर्ड
भारतीय कर्णधार म्हणून एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक १००० हून अधिक धावा करणारे खेळाडू
७ – एमएस धोनी
५ – सौरव गांगुली
४ – मोहम्मद अझरुद्दीन
४ – विराट कोहली<br>२ – सचिन तेंडुलकर
२ – राहुल द्रविड
२ – रोहित शर्मा</p>
हेही वाचा – IND vs BAN : विराट कोहलीला रिव्ह्यू टाळणं पडलं महागात; रोहित व अंपायरची प्रतिक्रिया होतेय व्हायरल
२०२४ मध्ये सर्वाधिक धावा करणारे कर्णधार
रोहित शर्मा – १००१ धावा
नजमुल हसन शांतो – ५७९ धावा
धनंजय डिसिल्वा – ४८५ धावा
बाबर आझम – ४४७ धावा
बेन स्टोक्स – ३९१ धावा
हेही वाचा – Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह चारशे पार; कपिल देव, शमी, झहीर यांच्या मांदियाळीत पटकावले स्थान
रोहित शर्माने खेळाडू म्हणून एका कॅलेंडर वर्षात १०व्यांदा १००० किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा पराक्रम केला. मात्र, ही कामगिरी करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर असून त्याने ही कामगिरी १६ वेळा केली आहे, तर विराट कोहलीने १२ वेळा, तर राहुल द्रविड आणि धोनीने प्रत्येकी ११ वेळा ही कामगिरी केली आहे. या यादीत रोहित चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.
एका कॅलेंडर वर्षात भारतासाठी १००० किंवा त्याहून अधिक धावा करणारे फलंदाज
१६ – सचिन तेंडुलकर
१२ – विराट कोहली
११ – राहुल द्रविड
११ – एमएस धोनी
१० – रोहित शर्मा