Happy Birthday Rohit Sharma: रोहित शर्मा आणि युवराज सिंग किती चांगले आणि घट्ट मित्र आहेत, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. रोहित आणि युवराजचं बॉन्डिंग खूप तगडं आहे. युवराज दरवर्षी अगदी न चुकता रोहित शर्माच्या वाढदिवसासाठी खास पोस्ट करत असतो. यावर्षीही युवराजने एक व्हीडिओ पोस्ट करत रोहितला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. पण युवराजच्या या व्हीडिओने सर्वांचं लक्ष वेधलं कारण म्हणजे युवीने रोहितला मराठमोळ्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

Yuvraj Singh Rohit Sharma: युवराजच्या रोहितला वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा

युवराज सिंगने रोहितच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रोहितचे छोटे-छोटे व्हीडिओ घेतले आहेत. सुरूवातीला रोहितचे डान्स करतानाचा काही भाग आ. त्यानंतर रोहितच्या काही स्पेशल इनिंग आणि शॉट्स आहेत. तर त्यानंतर युवी आणि रोहितचे पूर्वीपासूनचे आतापर्यंतचे काही फोटो आहेत. या व्हीडिओला युवराजने मराठमोळं गाणं दिलं आहे, ज्याची म्युझिकही अगदी मराठमोळी आहे. माझ्या भावा, माझ्या दोस्ता असे या गाण्याचे बोल आहेत. या व्हीडिओने सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

यासोबतच युवीने त्याला कॅप्शनमध्ये शुभेच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रोहितबद्दलचे अनेक प्रसंग, घटना युवीने मुलाखतींमध्ये सांगितल्या आहेत. याचसोबत अजून एक गोष्ट म्हणजे रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहही युवराजची मानलेली बहीण आहे आणि युवीमुळेच रितिका आणि रोहितची पहिली भेट झाली होती. मात्र एकदा त्याने रोहित शर्माला माझ्या बहिणीपासून दूर राहा असे सांगितले होते. रोहित म्हणाला, “रितिका आणि युवराज एका प्रमोशनल शूटसाठी भेटले होते. या दरम्यान, युवराज माझ्याकडे आला आणि म्हणाला, ती माझी बहीण आहे .. तिच्यापासून दूर राहा”

Story img Loader