Rohit Sharma is the second batsman to hit most sixes in ODI World Cup: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये शानदार फॉर्म कायम आहे. धरमशाला येथे न्यूझीलंडविरुद्धही त्याची दमदार फलंदाजी पाहायला मिळाली. रोहित शर्मा मैदानात उतरताच फटकेबाजी करताना दिसला. त्याने किवी संघाविरुद्ध दोन षटकार ठोकताच एबी डिव्हिलियर्सचा मोठा विक्रम मोडीत काढला. एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणारा रोहित शर्मा आता दुसरा फलंदाज ठरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित शर्माने मोडला एबी डिव्हिलियर्सचा विक्रम –

न्यूझीलंडविरुद्धच्या खेळीत रोहित शर्माने दोन षटकार मारताच, तो एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला. या दोन षटकारांसह, रोहित शर्माच्या खात्यात आता विश्वचषकात एकूण ३८ षटकार झाले आहेत.त्याने विश्वचषकात एकूण ३७ षटकार ठोकणाऱ्या एबी डिव्हिलियर्सला मागे टाकले आहे. मात्र, एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ख्रिस गेल आहे, ज्याने एकूण ४९ षटकार ठोकले आहेत. मात्र, या डावात रोहितने किवीजविरुद्ध ४ षटकार ठोकले आणि त्याच्या एकूण षटकारांची संख्या ४० झाली.

एकदिवसीय विश्वचषक इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज –

ख्रिस गेल – ३५ सामन्यात ४९ षटकार
रोहित शर्मा* – २२ सामन्यात ४० षटकार
एबी डिव्हिलियर्स – २३ सामन्यात ३७ षटकार
रिकी पाँटिंग – ४६ सामन्यात ३१ षटकार
ब्रेंडन मॅक्युलम – ३४ सामन्यात २९ षटकार

हेही वाचा – IND vs NZ: शुबमन गिल ठरला वनडेत सर्वात जलद २,००० धावा पूर्ण करणारा फलंदाज, मोडला हाशिम आमलाचा विक्रम

रोहित शर्माने खेळली ४६ धावांची खेळी –

न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात रोहित शर्माने ४ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ४६ धावांची खेळी केली.त्याने शुबमन गिलसोबत पहिल्या विकेटसाठी ७१ धावांची खेळी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. या खेळीसह रोहित शर्माने या विश्वचषकात ३०० धावा पूर्ण केल्या आणि या हंगामात हा आकडा स्पर्श करणारा पहिला फलंदाज ठरला. यानंतर त्याला लॉकी फर्ग्युसनने क्लीन बोल्ड केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma breaks ab de villiers record for most sixes in odi world cup in ind vs nz match vbm