भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने, वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० सामन्यात आपल्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहितने वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलला मागे टाकलं आहे. गेलच्या नावावर १०५ षटकार जमा आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहितने दुसऱ्या टी-२० सामन्यात ६७ धावांची खेळी करत ६ चौकार आणि ३ षटकार लगावले. सध्या रोहितच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १०६ षटकार जमा आहेत. पहिल्याच टी-२० सामन्यात रोहितला गेलचा विक्रम मोडण्याची संधी होती, मात्र या संधीचा लाभ त्याला घेता आला नाही. मात्र दुसऱ्याच सामन्यात अर्धशतकी खेळी करत रोहितने ही कसर भरून काढली.

अवश्य वाचा – Ind vs WI : हिटमॅन रोहितची ख्रिस गेलशी बरोबरी