ICC Cricket World Cup, India vs Afghanistan: विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शानदार विजयानंतर, टीम इंडिया ११ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर त्यांच्या दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानशी आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने जोरदार फटकेबाजी केली. त्याने या फटकेबाजीच्या जोरावर दोन मोठे विक्रम केले. त्यातील एक विक्रम ख्रिस गेलचा मोडला आहे, तर दुसऱ्या विक्रमात त्याने डेव्हिड वार्नरची बरोबर केली आहे.

रोहित शर्माने ख्रिस गेलला टाकले मागे –

रोहित शर्माने वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडला आहे. सामना सुरु होण्यापूर्वी रोहितच्या नावावर सध्या ५५१ षटकार होते, मात्र त्याने अफगाणिस्तानविरुद्ध तीन षटकार मारत ख्रिस गेलचा ५५३ षटकारांचा विक्रम मोडला. रोहित आता या तीन षटकारांच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सर्वात मोठा षटकार किंग ठरला आहे.

D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Gukesh becomes youngest-ever world champion
D Gukesh: डी गुकेश विश्वविजेता! भारताच्या बुद्धिबळपटूने घडवला इतिहास
Naveen Ul Haq Bowls a 13 Ball Over Including 6 Wides 1 No ball in AFG vs ZIM 1st T20I Match Watch Video
ZIM vs AFG: नवीन उल हकने टाकलं १३ चेंडूंचं षटक, ठरला संघाच्या पराभवाचं कारण, वाईड बॉलचा भडिमार; पाहा VIDEO
IND vs AUS 3rd Test Rain to Play Spoilsport in Brisbane Weather Update India WTC Qualification
IND vs AUS: ब्रिस्बेनमधील पाऊस आणणार भारताच्या WTC फायनलच्या शर्यतीत अडथळा, गाबा कसोटी रद्द झाली तर काय होणार?
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?
Mohammed Shami Can Join Team India in Australia After NCA Fitness Report IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमीबाबत दुसऱ्या कसोटीदरम्यान मोठी अपडेट, टीम इंडियासाठी आनंदाची बातमी

आंतरराष्ट्रीय स्तरावर जगातील सर्वात जास्त षटकार मारणारे फलंदाज –

रोहित शर्मा- ५५३
ख्रिस गेल- ५५२
शाहिद आफ्रिदी- ४७६
ब्रेंडन मॅक्युलम – ३९८
मार्टिन गप्टिल- ३८३
एमएस धोनी- ३५९

डेव्हिड वॉर्नरच्या विक्रमाची साधली बरोबरी –

इतकेच नाही तर या इनिंगमध्ये भारतीय कर्णधाराने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने आता एकदिवसीय विश्वचषकात आपल्या १००० धावा पूर्ण केल्या आहेत. तसेच, त्यांनी संयुक्तपणे हे सर्वात जलद केले आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने १९ व्या डावात हा विक्रम केला होता. आता रोहितने एकदिवसीय विश्वचषकात १९ डावात सर्वात जलद १००० धावा पूर्ण केल्या आहेत. या डावात त्याने शानदार आणि झंझावाती अर्धशतकही झळकावले. त्याने आपले अर्धशतक ३० चेंडूत पूर्ण केले.

रोहित शर्माने मोडला कपिल देवचा विक्रम –

भारतीय कर्णधार रोहित शर्माने ६३ चेंडूत शतक झळकावले. तो एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी सर्वात जलद शतक करणारा खेळाडू ठरला. या बाबतीत रोहितने महान कर्णधार कपिल देव यांचा विक्रम मोडला. कपिल देव यांनी १९८३ च्या विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध अवघ्या ७२ चेंडूत शतक झळकावले होते. रोहितच्या वनडे कारकिर्दीतील हे ३१ वे शतक होते.

राशिद खानने रोहित शर्माला केले बाद –

भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यादरम्यान शतकवीर रोहित शर्मा वैयक्तिक १३० धावांवर बाद झाला. राशिद खानच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना, तो क्लीन बोल्ड झाला. याआधीही त्याने संघासाठी आपले काम केले होते. रोहितने आज आपल्या खेळीत १५ चौकार आणि पाच षटकार मारले. त्याने ८४ चेंडूत १३० धावा केल्या

Story img Loader