भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना ईडन गार्डन्सवर सुरू आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मालिकेत विजयी आघाडी घेतलेल्या टीम इंडियाला हा सामना जिंकून किवी संघाचा ३-० असा धुव्वा उडवायचा आहे. रोहितने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहितने सलग तिसऱ्यांदा नाणेफेक जिंकली. आज केएल राहुलला विश्रांती दिल्यामुळे रोहितने इशान किशनसोबत सलामी दिली आणि अर्धशतक ठोकले.

रोहितचे हे सलग दुसरे अर्धशतक ठरले. रांचीतही त्याने ५०हून अधिक धावा बनवल्या होत्या. आता त्याने ईडन गार्डन्सवर अजून एक अर्धशतकी खेळी करत विराट कोहलीला मागे टाकले. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ५० हून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहितने विराटला मागे टाकले.

हेही वाचा – VIDEO : जैसे कर्म तैसे फळ..! पाकिस्तानच्या आफ्रिदीला ‘जबर’ दंड; रागाच्या भरात त्यानं…

आज रोहितने ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५६ धावांची खेळी केली. किशनसोबत त्याने ६९ धावांची भागीदारीही रचली. १२व्या षटकात ईश सोधीच्या गोलंदाजीवर रोहित झेलबाद झाला. समोर मोठा फटका खेळण्याच्या नादात रोहित तंबूत परतला. रिफ्लेस अॅक्शनमध्ये सोधीने हा अप्रतिम झेल टिपला.

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा