IND vs ENG 2nd ODI Updates in Marathi: रोहित शर्माने इंग्लंडविरूद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी करत आपला फॉर्म परत मिळवला आहे. रोहित शर्माने ९० चेंडूत ७ षटकारांसह आणि १२ चौकारांसह ११९ धावांची उत्कृष्ट खेळी करत भारताच्या विजयाचा पाया रचला. रोहित शर्माने याशिवाय ३० चेंडूत रोहितने ५२ धावा करत तुफानी अर्धशतक झळकावले. रोहितने ५० धावा करताच सचिन तेंडुलकरच्या मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्माने ख्रिस गेलला मागे टाकले आहे. रोहितने आता २६७ सामन्यांच्या २५९ डावांमध्ये ३३८ षटकार ठोकले आहेत. तर गेलने ३०१ सामन्यांच्या २९४ डावांमध्ये ३३१ षटकार मारले आहेत. या यादीत शाहिद आफ्रिदी ३५१ षटकारांसह पहिल्या क्रमांकावर आहे.

रोहित शर्माने भारताचा दिग्गज सलामीवीर सचिन तेंडुलकरच्या मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. सचिन तेंडुलकरने ३४६ सामन्यांत ४८.०७ च्या सरासरीने १५,३३५ धावा केल्या आहेत. ३७ वर्षीय रोहित तेंडुलकरचा हा धावांचा विक्रम मोडण्यापासून ५० धावा मागे होता. यासह रोहित शर्माने इंग्लंडविरूद्ध सामन्यात आपले अर्धशतक पूर्ण करत सचिनला मागे टाकलं आहे. वीरेंद्र सेहवाग हा भारतीय सलामीवीरांमध्ये सर्वाधिक धावा करणारा आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे ज्याने ३२१ सामन्यांत ४१.९० च्या सरासरीने १५,७५८ धावा केल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय सलामीवीर

वीरेंद्र सेहवाग – १६११९ धावा
रोहित शर्मा – १५,३५०* धावा
सचिन तेंडुलकर – १५,३३५ धावा
सुनील गावस्कर – १२,२५८ धावा
शिखर धवन – १०,८६७ धावा

रोहित शर्माचे दुसरे वेगवान शतक

रोहित शर्माच्या कारकिर्दीतील हे दुसरे वेगवान शतक ठरले. रोहितने कटक वनडेत अवघ्या ७६ चेंडूत शतक पूर्ण केले होते. याआधी रोहितने २०२३ वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध ६३ चेंडूत शतक पूर्ण केले होते. रोहितने २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्ध ८२ चेंडूत शतक झळकावले होते.

आपल्या खेळीच्या जोरावर रोहितने सचिन तेंडुलकरला अजून एका विक्रमाच्या बाबतीत मागे टाकले. भारतासाठी वयाच्या ३० वर्षांनंतर सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम आता रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहितच्या नावावर एकूण ३६ शतक आहेत. तर मास्टर ब्लास्टर सचिनच्या नावावर ३५ शतकं आहेत.