Rohit Sharma Gesture Win Hearts in Wankhede 50th Anniversary: १९ जानेवारी रोजी मुंबईतील प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमला ५० वर्षे पूर्ण झाली. वानखेडेच्या पन्नाशीनिमित्त मुंबई क्रिकेट असोसिएशनने एक खास सोहळा वानखेडेवर आयोजित केला होता. या सोहळ्यासाठी सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, रोहित शर्मा, रवी शास्त्री असे दिग्गज खेळाडू उपस्थित होते. वानखेडेच्या या सोहळ्यादरम्यान पाकिस्तानात यंदा होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा करंडक भारतात आणण्यात आला होता. या करंडकाबरोबर भारताच्या या दिग्गज खेळाडूंनी फोटो क्लिक केला. हा फोटो क्लिक करत असतानाच एक घटना घडली.

वानखेडेवरील या कार्यक्रमादरम्यान भारताच्या या दिग्गज खेळाडूंशी खास चर्चा करण्यात आली आणि वानखेडे स्टेडियमवरील त्यांच्या आठवणींनाही खेळाडूंनी उजाळा दिला. यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५चा करंडक कार्यक्रमादरम्यान स्टेजवर आणण्यात आला. यानंतर या करंडकासह सर्व दिग्गज खेळाडूंना एक फोटो घेण्यात येत होता.

Saif ali Khan Attacker attack
Saif Ali Khan : एका पराठ्यामुळे सापडला सैफचा हल्लेखोर; पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला? वाचा घटनाक्रम!
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Sanjay Raut on uday Samant
“एकनाथ शिंदे रुसले होते, तेव्हाच ‘उदय’ होणार होता”; संजय राऊतांच्या विधानाने खळबळ; राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता?
Neeraj Chopra Wedding Who is Himani Mor Tennis Player Wife of India Golden Boy
Neeraj Chopra Wife: कोण आहे नीरज चोप्राची पत्नी? टेनिसपटू आणि आता आहे मॅनेजर; अमेरिकेत घेतेय शिक्षण
Saif Ali Khan stabbing accused
Saif Ali Khan Stabbing Case: सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीची बाजू मांडण्यासाठी भर कोर्टात दोन वकिलांमध्ये जुंपली
Sanjay Raut on saif ali khan (1)
Sanjay Raut : “सैफ आणि करीना लव्ह जिहादचे प्रतिक होते अन् आता…”, संजय राऊतांनी भाजपाला सुनावलं!
Double Olympic Medallist Neeraj Chopra Married with Himani Mor
Neeraj Chopra Wedding: भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा अडकला विवाहबंधनात, फोटो केले शेअर; काय आहे पत्नीचं नाव?
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा – Neeraj Chopra Wedding: भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा अडकला विवाहबंधनात, फोटो केले शेअर; काय आहे पत्नीचं नाव?

चॅम्पियन्स ट्रॉफी करंडकाबरोबर फोटो घेत असताना सुनील गावस्कर आणि रवी शास्त्री यांनी रोहितला ट्रॉफीच्या बरोबर मागे मध्यभागी येण्यास सांगितले. पण रोहित शर्माने मोठ्या आदराने त्यांना नकार देत दिग्गजांना ट्रॉफीच्या मागे उभे राहण्यास सांगितले. सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, रवी शास्त्री हे तिघेही बरोबर ट्रॉफीच्या मागे म्हणजेच मध्यभागी उभे होते, तर उजव्या बाजूला महिला क्रिकेटपटू डायना इडुलजी आणि अजिंक्य रहाणे होते. तर ट्रॉफीच्या एकदम डाव्या बाजूला रोहित शर्मा उभा होता.

हेही वाचा – Neeraj Chopra Wife: कोण आहे नीरज चोप्राची पत्नी? टेनिसपटू आणि आता आहे मॅनेजर; अमेरिकेत घेतेय शिक्षण

रोहित शर्माच्या या कृतीने सर्वांची मनं जिंकली आहेत. रोहित शर्माने आपल्या वरिष्ठांना दिलेला मान पाहून त्याचं कौतुक होत आहे. याचप्रमाणे जेव्हा दिग्गज खेळाडूंना स्टेजवर उपस्थित केले होते. तेव्हा रवी शास्त्री हे स्टेजवर जाऊन कोपऱ्यातील खुर्चीत बसले होते. यानंतर रोहित शर्माने स्टेजवर जात रवी शास्त्री यांना तिथून उठवत मध्यभागी असलेल्या खुर्च्यांवर बसण्याची विनंती केली आणि इतर सर्व वरिष्ठ खेळाडू बसल्यानंतर रोहित शर्मा आपल्या खुर्चीत बसला. रोहितचे हे दोन्ही व्हीडिओ चांगलेच व्हायरल होत आहेत.

हेही वाचा – Kho Kho World Cup 2025: भारत खो-खो वर्ल्ड चॅम्पियन, महिला संघासह पुरूष संघाची सुवर्णपदकाला गवसणी

रोहितने शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मोहिमेबद्दल बोलताना सांगितले की तो आणि त्याचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफी वानखेडे स्टेडियमवर परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल,. उल्लेखनीय म्हणजे, भारताने गेल्या वर्षी मुंबईतील मरीन ड्राइव्हजवळ ओपन बस परेडसह भारताचा टी-२० विश्वचषक विजय साजरा केला. परेडचा समारोप वानखेडे स्टेडियमवर दिमाखदार सत्कार समारंभात पार पडला होता.

हेही वाचा – Wankhede Stadium 50th Anniversary: वानखेडेच्या पन्नाशीचा कार्यक्रम मुंबईत संपन्न, कार्यक्रमात काय काय घडलं? वाचा

१९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या १५ सदस्यीय संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड करण्यात आली. शुबमन गिलला संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. ज्यात विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी शनिवारी १८ जानेवारी रोजी मुंबईत संघाची घोषणा केली.

Story img Loader