आयपीएलच्या यंदाच्या हंगामात क्लालिफायच्या शर्यतीतून बाहेर पडणारा हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स पहिला संघ ठरला आहे. आयपीएलची सुरुवात होण्याच्या आधीपासूनच रोहित शर्माला कर्णधार पदावरून बाजूला केल्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ अस्थिर वाटत होता. विशेष म्हणजे, जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या भारतीय संघात मुंबई इंडियन्स संघातील चार खेळाडू आहेत. रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे, तर हार्दिक पंड्या उपकर्णधार, सुर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांचाही संघात समावेश आहे. मात्र हार्दिक पंड्याला भारतीय संघात घ्यावे की नाही? याबाबत संभ्रम होता, अशी माहिती आता समोर येत आहे.
दैनिक जागरणने दिलेल्या बातमीनुसार, हार्दिक पंड्याकडे मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद दिल्यानंतर हळूहळू संघ स्थिरस्थावर होईल, अशी शक्यता वाटत होती. पण तसे झाले नाही. जागरणने दिलेल्या बातमीनुसार, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, निवड समितेचे काही सदस्य आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर हे अंतिम १५ मध्ये हार्दिक पंड्याचा समावेश करण्यास उत्सुक नव्हते.
यंदाच्या आयपीएल हंगामात हार्दिक पंड्याबाबत अनेक चर्चा झाल्या. त्याच्या फॉर्मवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. आतापर्यंतच्या १३ सामन्यात त्याने १४४.९३ च्या स्ट्राईक रेटने फक्त २०० धावा केल्या आहेत. तर १३ सामन्यात मिळून गोलंदाजीत ११ बळी घेतले आहेत. त्याने गोलंदाजीत दिलेल्या धावांची सरासरी प्रति षटक १०.५९ एवढी आहे. आयपीएलचा निम्मा हंगाम लोटल्यानंतर पंड्याला गोलंदाजीत लय पकडता आली.
हार्दिक पंड्याचा विश्वचषकाच्या संघात दबावाखाली समावेश करण्यात आला, असेही या बातमीत म्हटले गेले आहे. तसेच टी-२० विश्वचषकानंतर रोहित शर्मा टी-२० क्रिकेटला राम राम ठोकण्याची शक्यता आहे, असेही सांगितले जात आहे.
टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करत असताना कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी अजित आगरकर यांना हार्दिकच्या संघातील समावेशाबाबत प्रश्न विचारण्यात आला. फॉर्म नसतानाही हार्दिक पंड्याला संघात घेण्याचे कारण काय? असे विचारले असता अजित आगरकर म्हणाले की, निवड समितीकडे हार्दिक पंड्यासाठी अधिक पर्याय नव्हते. हार्दिक पंड्या जे करू शकतो, त्यासाठी पर्याय नसल्यामुळे त्याची निवड करण्यात आली.