Rohit Sharma Hang Out With Friends: झिम्बाब्वे आणि श्रीलंका दौऱ्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू सध्या विश्रांती घेत आहेत. सध्या खेळाडू विश्रांती घेत असून यानंतर टीम इंडियाला लागोपाठ अनेक महत्त्वाच्या मालिका खेळायच्या आहेत. सध्या खेळाडू आपल्या कुटुंबाबरोबर असून त्यांच्यासह वेळ घालवत आहेत. यादरम्यान रोहित शर्मा त्याच्या मित्रांबरोबर वेळ घालवतानाचा फोटो समोर आला आहे.
हेही वाचा – Mohammed Shami: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाची तारीख ठरली! १० महिन्यानंतर ‘या’ स्पर्धेत खेळणार पहिला सामना
रविवारी, १८ ऑगस्टला भारताचा कर्णधार रोहित शर्मा त्याच्या मित्रांसह म्हणजेच भारताचा माजी क्रिकेटपटू धवल कुलकर्णी आणि भारताचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर तर त्यांचे इतरही काही मित्र यांच्यासह वेळ घालवताना दिसला. धवल कुलकर्णीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ग्रुपचा हा फोटो पोस्ट केला ज्यामध्ये ते एका कॅफेमध्ये भेटले आहेत. धवलने त्यांचा हा फोटो पोस्ट करत आमचं असंच चालतं… असं कॅप्शन दिलं आहे आणि पुढे खाण्याच्या पदार्थांचे काही इमोजी दिले आहेत.
भारतीय संघ मोठ्या विश्रांतीपूर्वी झिम्बाब्वे आणि श्रीलंकेी दौऱ्यावर होता. दोन्ही देशांविरुद्ध टी-२० मालिका जिंकल्यानंतर, एकदिवसीय मालिका भारताने २-० ने गमावली. भारताने २८ वर्षांनंतर श्रीलंकेविरूद्ध एकदिवसीय मालिका गमावली. गौतम गंभीर यांची भारतीय प्रशिक्षक म्हणून पहिलीच मालिका होती आणि त्यांच्या कार्यकाळात भारतासाठी ही चांगली सुरुवात नव्हती कारण संघ श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांविरूद्ध खेळण्यात अपयशी ठरला आणि झटपट विकेट गमावल्या.
हेही वाचा – IND vs SL: सुपर ओव्हरचं विसरले अंपायर; भारत-श्रीलंका सामना राहिला टाय
भारताचा कर्णधार रोहित शर्माने मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये शानदाक फलंदाजी करत दोन अर्धशतके झळकावली. रोहितने ३ सामन्यांत १५७ धावा करत मालिकेत भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या. या विश्रांतीनंतर आता भारतीय संघ बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध भारतात मालिका खेळणार आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी भारत या दोन देशांविरुद्ध कसोटी आणि टी-२० मालिका खेळेल. ऑस्ट्रेलियाचा दौऱ्यात चांगली कामगिरी करत भारतीय संघ बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर आपले वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मागील द्विपक्षीय कसोटी मालिकेत भारताने घरच्या मैदानावर विजय मिळवून ४ सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली होती. त्याआधी, भारताने ऑस्ट्रेलियात विराट कोहली आणि नंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली दोन कसोटी मालिका आपल्या नावे केल्या.
© IE Online Media Services (P) Ltd