रोहित शर्मा दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाऊ शकला नाही. आता भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय आणि टी-२० मालिका ६ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेपूर्वी मोठी बातमी समोर आली आहे. कर्णधार रोहितने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमधील फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली आहे. म्हणजेच तो वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना दिसणार आहे. तर रवींद्र जडेजाबाबतही संशयाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यांना कमबॅक करायला वेळ लागू शकतो. वनडे सुपर लीग पाहता ही मालिका भारतासाठी महत्त्वाची आहे.
इनसाइड स्पोर्ट्सच्या बातमीनुसार, रोहित शर्माने फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली आहे आणि आता तो संघ निवड समितीशी चर्चा करणार आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की रोहित शर्मा फिट आहे आणि मालिका खेळण्यासाठी तयार आहे. वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी सर्व खेळाडू फिटनेस चाचणीसाठी बंगळुरूला येणार आहेत.या मालिकेपूर्वी अहमदाबादमध्ये संघाचे छोटे शिबिरही होणार आहे.”
हेही वाचा – Republic Day 2022 : सचिननं देशवासियांना दिला खास संदेश; VIDEO शेअर करत म्हणाला, ‘‘फक्त खेळ बघू नका…”
क्रिकबझच्या बातमीनुसार, फिरकीपटू आर. अश्विन दुखापतीमुळे जवळपास तीन आठवड्यांसाठी संघाबाहेर गेला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याला ५ वर्षांनंतर वनडे खेळण्याची संधी मिळाली. पण त्याला काही विशेष कामगिरी करता आली नाही. अश्विनच्या जागी डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला संधी दिली जाऊ शकते. कुलदीप आणि यजुर्वेंद्र चहलची जोडी चांगलीच गाजली. मात्र नंतर कुलदीप संघाबाहेर गेला.
एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
- ६ फेब्रुवारी: पहिला वनडे, अहमदाबाद
- ९ फेब्रुवारी: दुसरी वनडे, अहमदाबाद
- ११ फेब्रुवारी: तिसरी वनडे, अहमदाबाद
टी-२० मालिकेचे वेळापत्रक
- १६ फेब्रुवारी: पहिली टी-२०, कोलकाता
- १८ फेब्रुवारी: दुसरी टी-२०, कोलकाता
- २० फेब्रुवारी: तिसरी टी-२०, कोलकाता