IND vs ENG 2nd ODI Updates in Marathi: ३० चेंडू, ४ चौकार, ४ षटकार अन् ५२ धावा…. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने इंग्लंडविरूद्ध झंझावाती अर्धशतक झळकावत आपल्या पुनरागमनाचं बिगुल वाजवलं आहे. रोहित शर्माने दुसऱ्या वनडे सामन्यात आपल्या जुन्या अंदाजात वादळी फलंदाजी करत भारताला एक चांगली सुरूवात करून दिली आहे. सामन्यात व्यत्यय आल्यानंतरही रोहित शर्माने आपली लय कायम ठेवत चांगली फटकेबाजी सुरूच ठेवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहित शर्मा गेल्या बऱ्याच काळापासून वाईट फॉर्ममधून जात आहे. टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्माच्या बॅटमधून मोठ्या धावा पाहिल्या मिळत नव्हत्या. यामुळे रोहित शर्मावर खूप टीका होत होती. ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेत तर रोहित शर्माने फार निराशा केली. यानंतर रोहितच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित केले जात होते. रोहित शर्मा पहिल्या वनडे सामन्यातही एकेरी धावसंख्येवर बाद झाला होता. पण रोहितने आता एकाच खेळीत सर्वांना चोख उत्तर दिलं आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी इंग्लंडविरूद्धची वनडे मालिका भारतासाठी सराव असणार आहे. रोहित शर्माच्या खांद्यावर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाची कमान सोपवण्यात आली होती. त्यामुळे त्याचा फॉर्म खूप महत्त्वाचा असणार होता. पण रोहित शर्माला अखेरीस सूर गवसला आणि त्याने इंग्लंडविरूद्ध आत्मविश्वासाने चांगले आणि मोठे फटके खेळत चांगली कामगिरी करून दाखवली आहे.

रोहित शर्माचे अर्धशतक आणि शुबमन गिलच्या फटकेबाजीसह भारताने १४ षटकांत १०० धावांचा टप्पा गाठला आहे. भारताचे दोन्ही फलंदाज चांगल्या लयीत असून मोठ्या धावसंख्येसाठी भारताचा पाया रचत आहेत.

रोहित शर्माची वनडे क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतक (चेंडूंप्रमाणे)

२७ चेंडू वि. बांगलादेश, मीरपूर २०२२
२९ चेंडू वि . श्रीलंका, कोलंबो २०२४
३० चेंडू वि. अफगाणिस्तान, दिल्ली २०२३
३० चेंडू वि. इंग्लंड, कटक २०२५
३१ चेंडू वि. ऑस्ट्रेलिया, राजकोट २०२३