Rohit Sharma completed his 50 Test matches: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनमध्ये खेळवला जात आहे. ७ जूनपासून सुरू झालेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्मासाठी हा सामना खूप खास आहे. फायनल असण्यासोबतच हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ५० वा सामना आहे. भारतासाठी सर्वाधिक कसोटी खेळण्याच्या बाबतीत रोहित २८व्या स्थानावर आहे.

रोहितच्या कारकिर्दीतील हा ५० वा कसोटी सामना –

खरंतर बीसीसीआयने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या टॉसनंतर रोहितचा फोटो शेअर केला आहे. यासोबतच रोहितच्या कारकिर्दीतील हा ५० वा कसोटी सामना असल्याचे ट्विटमध्ये सांगण्यात आले. टीम इंडियासाठी सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने २०० सामने खेळले आहेत. या बाबतीत रोहित २८ व्या स्थानावर आहे.

West Indies Beat England with New Record of Highest Successful Chase in in T20I At Home Soil of 219 Runs WI vs ENG
ENG vs WI: वेस्ट इंडिजचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय! संथ सुरूवातीनंतर षटकारांचा पाऊस, कॅरेबियन संघाने मोडला ७ वर्षे जुना विक्रम
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Shubman Gill ruled out of first Test match in Perth because of fractured thumb IND vs AUS Border Gavaskar Trophy
IND vs AUS: शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ खेळाडू करणार पदार्पण?
Sanju Samson Tilak Varma Smash World Record in Johannesburg with Fiery Centuries in T20I IND vs SA
IND vs SA: तिलक वर्मा-संजू सॅमसनचे ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, जोहान्सबर्गमध्ये लावली विक्रमांची चळत; वाचा १० अनोखे विक्रम
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
KL Rahul Injured in Intra Squad Match Simulation Session Perth Walks Off Field for Scanning Ahead Border Gavaskar Trophy IND vs AUS
IND vs AUS: भारताला पर्थ कसोटीपूर्वी मोठा धक्का, केएल राहुलला सराव सामन्यात दुखापत, सोडावं लागलं मैदान!
Arshdeep Singh Becomes India Most Successful T20I Fast Bowler Surpasses Jasprit Bumrah and Bhuvneshwar Kumar with 92 Wickets IND vs SA
IND vs SA: अर्शदीप सिंगने बुमराह-भुवनेश्वरला मागे टाकत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिला वेगवान गोलंदाज
Arjun Tendulkar Maiden Five Wicket Haul in First Class Cricket Ranji Trophy Goa vs Arunachal Pradesh
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदाच पटकावल्या ५ विकेट्स; रणजी करंडक स्पर्धेत भेदक गोलंदाजी; ८४ धावांवर संघ सर्वबाद

रोहितच्या आतापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने ८३ डावात ३३७९ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये रोहितने ९ शतके आणि १४ अर्धशतकं झळकावली आहेत. त्याने एक द्विशतकही झळकावले आहे. रोहितची कसोटी सर्वोत्तम धावसंख्या २१२ आहे. नोव्हेंबर २०१३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध सामना खेळताना त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

हेही वाचा – IND vs AUS, WTC 2023 Final: मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियाला दिला पहिला धक्का, उस्मान ख्वाजा झाला शून्यावर बाद, पाहा VIDEO

भारतासाठी सर्वाधिक कसोटी सामने खेळणारे खेळाडू –

विशेष म्हणजे सचिनने भारतासाठी सर्वाधिक २०० कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १५९२१ धावा केल्या आहेत. राहुल द्रविड दुसऱ्या स्थानावर आहे. द्रविडने १६३ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १३२६५ धावा केल्या आहेत. व्हीव्हीएस लक्ष्मण १३४ कसोटी सामन्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. अनिल कुंबळे १३२ सामन्यांसह चौथ्या स्थानावर आहे. भारतीय संघाचा सध्याचा खेळाडू विराट कोहली ९व्या क्रमांकावर आहे. कोहलीने १०९ सामने खेळले आहेत. चेतेश्वर पुजाराने १०३ सामने खेळले आहेत. तो ११व्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा – IND vs AUS, WTC 2023 Final: रोहित शर्मा विदेशात प्रथमच करतोय कसोटी संघाचे नेतृत्व, जाणून घ्या त्याची वनडे आणि टी-२० मधील कामगिरी

डब्ल्यूटीसी फायनल सामन्याची अपडेट –

डब्ल्यूटीसी फायनल सामन्याबद्दल बोलायचे, तर नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने २२ षटकांनंतर २ बाद ७२ धावा केल्या आहे. सध्या खेळपट्टीवर मार्नस लाबूशेन (२६) आणि स्टीव्ह स्मिथ (१) धावांवर खेळत आहे. तत्पुर्वी उस्मान ख्वाजा (०) आणि डेव्हिड वार्नर ४३ धावांवर बाद झाला. भारताकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकुरने प्रत्येकी १-१ विकेट घेतली. बाद झालेल्या दोन्ही फलंदाजांचे झेल यष्टिरक्षक श्रीकर भरतने टिपले.