IND vs BAN Match Updates in Marathi: भारतीय संघाचा कर्णधार आणि सलामीचा फलंदाज रोहित शर्माने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी आपल्या नावे केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील बांगलादेशविरूद्धच्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरला आहे. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद होत २२८ धावा केल्या. बांगलादेशने दिलेल्या २२९ धावांच्या लक्ष्याच पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा आणि शुबमन गिलची जोडी उतरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहित शर्माने या सामन्यात एकाच षटकात दोन चौकार मारत मोठा टप्पा गाठला आहे. हिटमॅन म्हणून प्रसिद्ध असलेला रोहित शर्मा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ११ हजार धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. या बाबतीत त्याने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. मात्र, या यादीत नंबर वन फलंदाज विराट कोहली आहे.

उजव्या हाताचा फलंदाज रोहित शर्माने बांगलादेशविरुद्ध ११ धावा करताच, त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११ हजार धावांचा टप्पा गाठला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ११ हजार किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो भारताचा चौथा फलंदाज ठरला. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि सौरव गांगुली यांनी ११ हजार किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.

रोहित शर्माने २६१ डावांमध्ये ११ हजार धावांचा टप्पा ओलांडला, तर सचिन तेंडुलकरने २७६ डावात हा पराक्रम केला, तर विराट कोहलीने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ २२ डावांमध्ये ११ हजार धावा पूर्ण केल्या. या यादीत रिकी पाँटिंग चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २८६ डावांमध्ये ११ हजार धावा केल्या होत्या. सौरव गांगुलीने २८८ डावात हा टप्पा गाठला होता. रोहित (११८६८) पेक्षा फक्त विराट कोहली (११८३१) एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११ हजार धावा लवकर पूर्ण करण्यात यशस्वी ठरला.

सर्वात कमी डावात ११ हजार वनडे धावा पूर्ण करणारे खेळाडू

२२२ – विराट कोहली

२६१ – रोहित शर्मा

२७६ – सचिन तेंडुलकर

२८६ – रिकी पाँटिंग

२८८ – सौरव गांगुली