Mumbai Indians Shared Special Video on Rohit Sharma: रोहित शर्मा गेल्या बऱ्याच वर्षांपासून आयपीलमधील मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्सने विक्रमी पाच वेळा या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. गेल्या मोसमात रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आले होते. पण आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी खूपच खराब होती, पण रोहितने नक्कीच चांगली कामगिरी केली.
रोहितने आयपीएल २०२४ मध्ये शतकी कामगिरी केली होती. आता नव्या सत्रात रोहित पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सने संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मासाठी एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या खास व्हीडिओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
मुंबई इंडियन्सने रोहित शर्मासाठी का शेअर केला खास व्हीडिओ?
रोहित शर्मा ८ जानेवारी २०११ पासून मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. यासह रोहित शर्माला मुंबई इंडियन्स संघासह १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. रोहित गेल्या १४ वर्षांपासून मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसत आहे. यादरम्यान त्याने संघाला ५ वेळा आयपीएलचे विजेतेपदही मिळवून दिले आहे. आता १४ वर्षे पूर्ण झाल्यामुळे मुंबई इंडियन्सने रोहित शर्मासाठी एक खास व्हिडिओ शेअर केला आहे.
यासह रोहित शर्माकरता ‘ये से वो’ असं म्हणत एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी रोहितला १४ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रोहितचे १४ विविध फोटो शेअर केले आहेत आणि यामधून त्याचा प्रवास दाखवला आहे. २०१२ मध्ये रोहितचं मुंबई इंडियन्सकडून पहिलं शतक, २०१३ मध्ये मुंबई इंडियन्सची पहिली आयपीएल ट्रॉफी असे अनेक प्रसंग दाखवले आहेत.
हेही वाचा – विराट कोहलीबरोबर धक्काबुक्कीनंतर मैदानाबाहेर भेटल्यावर नेमकी चर्चा झाली? कॉन्स्टासने स्वत: सांगितलं
२०११ च्या आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला ९.२ कोटी रुपयांना खरेदी केले आणि तेव्हापासून रोहित मुंबई इंडियन्ससाठी वरदार ठरला. रोहितला ८ जानेवारी २०११ ला चौथ्या आयपीएल हंगामातील लिलावात १२.१७ वाजता बोलींच्या युद्धानंतर संघात सामील केले. मुंबई इंडियन्सने अगदी वेळेसह रोहित शर्मा पहिला संघात कधी दाखल झाला हे सांगितलं आहे.
१४ वेगवेगळ्या मोसमात मुंबई इंडियन्सकडून खेळणारा रोहित हा एकमेव खेळाडू आहे आणि सलग १५ व्या मोसमात तो संघासाठी खेळणार आहे. याआधी रोहित डेक्कन चार्जर्सकडून खेळायचा, जो आता सनरायझर्स हैदराबाद म्हणून ओळखला जातो. २०१३ मध्ये, रोहितने मुंबई इंडियन्ससाठी पहिली IPL ट्रॉफी जिंकली.