भारताचा शैलीदार फलंदाज रोहित शर्माने सलग तिसऱ्यांदा क्रिकइन्फो पुरस्कारावर नाव कोरले. २०१३ आणि २०१४ मध्ये एकदिवसीय प्रकारातील द्विशतकांकरिता गौरवण्यात आलेल्या रोहितची यंदा ट्वेन्टी-२० प्रकारातील सवरेत्कृष्ट खेळीसाठी निवड झाली. रोहितने धरमशाला येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साकारलेल्या १०६ धावांच्या खेळीची परीक्षकांनी एकमताने निवड केली. कसोटीमधील सवरेत्कृष्ट खेळीचा पुरस्कार केन विल्यम्सनने, तर एकदिवसीय खेळीतील सवरेत्कृष्ट खेळीसाठी ए बी डी’व्हिलियर्सची निवड करण्यात आली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या १५ धावांत ८ बळींच्या भन्नाट स्पेलसाठी स्टुअर्ट ब्रॉडची कसोटी प्रकारातील सवरेत्कृष्ट पुरस्कारासाठी निवड झाली. गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध ३३ धावांत ७ बळी टिपणारा टिम साऊदी एकदिवसीय प्रकारातील, तर वेस्ट इंडिजविरुद्ध २३ धावांत ५ बळी घेणारा डेव्हिड वीसची सवरेत्कृष्ट ट्वेन्टी-२० कामगिरी ठरली. सवरेत्कृष्ट पदार्पणवीर म्हणून बांगलादेशच्या मुस्ताफिझूर रहमानची निवड झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून काही दिवसांपूर्वीच निवृत्त झालेला ब्रेंडन मॅक्क्युलम वर्षांतील सवरेत्कृष्ट कर्णधार ठरला. इयन चॅपेल, कर्टनी वॉल्श, जॉन राइट, महेला जयवर्धने यांच्यासह अजित आगरकर, संजय मांजरेकर, रसेल अरनॉल्ड आणि मार्क निकोलस यांच्या परीक्षक मंडळाने पुरस्कार्थीची निवड केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा