Rohit Sharma Statement on his Test Cricket Retirement : टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केले आहे की, सिडनी कसोटीतून बाहेर बसण्याचा अर्थ असा नाही की तो निवृत्ती घेणार आहे. यासोबतच हिटमॅनने असेही सांगितले की, त्याचा खराब फॉर्म पाहता पाचवा आणि शेवटचा सामना न खेळण्याचा निर्णय त्याने घेतला होता, त्याने हा निर्णय सामन्याच्या एक दिवस आधी प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांना सांगितला. सिडनी कसोटीत रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराह कर्णधार आहे.
रोहित शर्मा काय म्हणाला?
दुसऱ्या दिवशी लंच ब्रेक दरम्यान, स्टार स्पोर्ट्सवर इरफान पठाण आणि जतीन सप्रू यांना दिलेल्या मुलाखतीत रोहित शर्माला जेव्हा विचारण्यात आले की त्याला संघातून वगळण्यात आले आहे, विश्रांती घेतली आहे की त्याने स्वतःच बाहेर राण्याचा निर्णय घेतला आहे? प्रत्युत्तरात भारतीय कर्णधार म्हणाला, “काही नाही (हसत). मी स्वतः बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे. निवडकर्त्यांना आणि प्रशिक्षकांना सांगितले की माझ्या बॅटमधून धावा होत नाहीत, म्हणून मी बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे.”
‘म्हणून मी बाहेर घेण्याचा निर्णय घेतला’ –
दुस-या दिवशी लंच ब्रेक दरम्यान, स्टार स्पोर्ट्सवर इरफान पठाण आणि जतीन सप्रू यांना दिलेल्या मुलाखतीत रोहित शर्माला जेव्हा विचारण्यात आले की त्याला संघातून वगळण्यात आले आहे, विश्रांती घेतली आहे की त्याने स्वतःच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे? याला उत्तर देताना भारतीय कर्णधार म्हणाला, “काही नाही (हसत). ते मी स्वतः काढले आहे. मी निवडकर्त्यांना आणि प्रशिक्षकांना सांगितले की माझ्या बॅटमधून मला धावा मिळत नाहीत, म्हणून मी बाहेर घेण्याचा निर्णय घेतला आहे.”
हेही वाचा – Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने मोडला ४७ वर्षे जुना विक्रम, ऑस्ट्रेलियाविरुद्ध केला नवा विक्रम
निवृत्ती घेण्याचा कोणताही विचार नाही –
रोहित शर्मा पुढे म्हणाला, “सध्या धावा होत नाहीत, पण पाच महिन्यांनंतर किंवा दोन महिन्यांनंतरही धावा होणार नाहीत याची शाश्वती नाही. मी खूप मेहनत करेन. बाहेर लॅपटॉप, पेन आणि कागद घेऊन बसलेल्या लोकांना अधिकार नाही की मी कधी निवृत्ती घ्यावी किंवा कोणते निर्णय घ्यावेत. माझा निवृत्ती घेण्याचा कोणताही विचार नाही. मी फॉर्ममध्ये नसल्यामुळेच मी बाहेर आहे. भविष्यात काय होईल हे तुम्हाला माहीत नाही. मी धावाही करू शकतो किंवा कदाचित नाही. पण मला विश्वास आहे की मी परत येऊ शकेन. असे म्हटल्यावर मलाही वास्तववादी व्हायला हवे.”
सिडनी कसोटीत बाहेर बसण्याच्या निर्णयावर हिटमॅन म्हणाला, “माझे संभाषण अगदी सोपे होते. मी म्हणालो की मी धावा करू शकत नाही आणि आम्हाला या महत्त्वाच्या सामन्यात धावा करू शकतील अशा खेळाडूंची गरज आहे. मला हे प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांना सांगायचे होते. यात त्यांनी मला साथ दिली. हा एक शहाणपणाचा निर्णय होता. मी फक्त संघासाठी काय करावे याचा विचार केला.” या मालिकेत रोहितच्या बॅटने अजिबात तळपलेली नाही, पाच डावात त्याच्या बॅटमधन केवळ ३१ धावा आल्या आहेत.