Rohit Sharma Statement on Opening Spot in India Playing XI: भारत वि ऑस्ट्रेलिया अॅडलेड कसोटीपूर्वी भारताचा नियमित कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा भारतीय संघात दाखल झाला आहे. रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियात पोहोचला नव्हता. रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुलने यशस्वी जैस्वालबरोबर सलामीवीराची भूमिका पार पाडली होती. आता रोहित शर्मा संघात दाखल झाल्यानंतर सलामीला कोण उतरणार हा प्रश्न होता. यावर रोहित शर्माने स्पष्ट उत्तर दिलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
रोहित शर्माने दुसऱ्या कसोटीपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत मोठा निर्णय जाहीर करत सांगितले की, केएल राहुल हा यशस्वी जैस्वालबरोबर सलामीला उतरणार आहे. तर कर्णधार रोहित शर्मा मधल्या फळीत फलंदाजी करेल. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत, केएल राहुलने पर्थ कसोटीत सलामी दिली होती, जिथे त्याने दुसऱ्या डावात ७७ धावांची उत्कृष्ट खेळी केली. राहुलची ती खेळी पाहून रोहित शर्माने आपल्या सलामीच्या जागेचा त्याग केला असून आता तो संघाच्या भल्यासाठी इतर क्रमांकावर फलंदाजी करेल.
केएल राहुल की रोहित शर्मा कोण असणार अॅडलेड कसोटीत सलामीवीर?
k
रोहित शर्मा म्हणाला, “हो तो (केएल राहुल) सलामीसाठी उतरेल, मी कुठेतरी मधल्या फळीत फलंदाजीसाठी उतरेन.” यानंतर सलामीवीर केएल राहुलच्या फलंदाजीचे कौतुक करताना रोहित शर्मा म्हणाला, “मी राहुलला घरी असताना फलंदाजी करताना पाहिलं, त्याने अप्रतिम फलंदाजी केली. त्यामुळे आता सलामीच्या जोडीत कोणताही बदल करण्याची गरज नाही. भविष्यात या गोष्टींमध्ये नक्कीच बदल होऊ शकतात. विदेशी खेळपट्ट्यांवर केएल राहुल ज्या प्रकार फलंदाजी करतो, त्यामुळे सलामीवीराची जबाबदारी त्याला देणं स्वाभाविक आहे.”
रोहित शर्माने सांगितले की, सध्या तो कोणत्या नंबरवर फलंदाजीसाठी उतरणार हे अजून निश्चित झालेलं नाही. रोहितने सांगितले की तो मध्यल्या फळीत फलंदाजीसाठी उतरेल. टॉप ४ फलंदाज मात्र निश्चित झाले आहेत. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल पहिल्या दोन क्रमांकावर असतील. त्यानंतर शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. विराट कोहली चौथ्या क्रमांकावर असेल. रोहित शर्मा पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर खेळू शकतो.
ग
मधल्या फळीत खेळणं संघासाठी फायदेशीर ठरू शकतं, असे रोहित शर्माने पत्रकार परिषदेत सांगितले. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना रोहित शर्माची सरासरी ५० पेक्षा जास्त आहे, यापूर्वीही रोहितने मधल्या फळीत फलंदाजी करताना विस्फोटक खेळी केल्या आहेत. त्यामुळे रोहित शर्मा आता कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
r