Rohit Sharma Dance Move Video in Wankhede 50th Anniversary: वानखेडे स्टेडियमच्या सुवर्णमहोत्सवाचा दिमाखदार सोहळा वानखेडेवर मुंबईत १९ जानेवारीला पार पाडला. मुंबईतील प्रतिष्ठिता वानखेडे स्टेडियम हे १९ जानेवारी १९७५ मध्ये उभारण्यात आले होते आणि आता २०२५ मध्ये या स्टेडियमला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या कार्यक्रमादरम्यानचा रोहित शर्मा श्रेयस अय्यरला स्टेजवर मैदानावर डान्स करण्यासाठी बोलवतानाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वानखेडे स्टेडियमच्या पन्नाशीच्या कार्यक्रमात माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांचा ७५वा वाढदिवस साजरा करण्यात आला. लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी २०२५ मध्ये ७५व्या वर्षात पाऊल ठेवलं. येत्या ११ जुलैला त्यांचा ७५वा वाढदिवस असणार आहे. पण या कार्यक्रमादरम्यान सर्व चाहत्यांसमोर केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यादरम्यान एमसीएचे अध्यक्ष यांनी बॉलीवूड गायक शेखर रावजियानी याला गावस्करांसाठी खास गाणं बोलण्याकरता मंचावर बोलावले.

हेही वाचा – VIDEO: रोहित शर्माच्या कृतीने वानखेडेवर जिंकली सर्वांची मनं, चॅम्पियन्स ट्रॉफी करंडकाबरोबर फोटो काढताना पाहा काय घडलं?

शेखर रावजियानी ‘ओम शांती ओम’ गाणं गात असताना सर्व खेळाडू मागे उभे असतात. दरम्यान रोहित शर्मा समोर बसलेल्या कोणालातरी इशारा स्टेजवर येण्यासाठी इशारा करताना दिसतो. त्यानंतर तो डान्स मुव्ह करत नाचण्यासाठी स्टेजवर ये असं बोलवताना दिसला, तर रोहित शर्मा हा श्रेयस अय्यरला स्टेजवर डान्स करण्यासाठी बोलवत होता. त्यानंतर रवि शास्त्रीही त्याला बघून काहीतरी बोलतात तेव्हा तो त्यांच्याकडे पाहत हसत श्रेयसला बोलवत असल्याचे सांगतो. श्रेयसही रोहितचा इशारा पाहून जोरजोरात हसू लागतो. रोहितच्या या डान्स मुव्हचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा – Shreyas Iyer: श्रेयस अय्यर आणि KKR यांची का झाली ताटातूट? जेतेपद पटकावल्यानंतरही का केलं नाही रिटेन?

रोहित-श्रेयसच्या या डान्स मुव्हनंतर चाहत्यांना एका जुन्या डान्स व्हीडिओची आठवण झाली. ज्यामध्ये रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूरने कोई सेहरी बाबू या व्हायरल गाण्यावर डान्स व्हीडिओ केला होता, जो चांगलाच व्हायरल झाला होता.

हेही वाचा – Neeraj Chopra Wife: कोण आहे नीरज चोप्राची पत्नी? टेनिसपटू आणि आता आहे मॅनेजर; अमेरिकेत घेतेय शिक्षण

यानंतर २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी करंडकासह सर्व दिग्गज खेळाडूंनी फोटो काढला. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल बोलताना, रोहितने २०११ एकदिवसीय विश्वचषक आणि २००७ आणि २-२४ टी-२० विश्वचषक विजयांची आठवण करून देत वानखेडेवर विजेतेपद आणण्याची आपली महत्त्वाकांक्षा व्यक्त केली. ‘मला खात्री आहे की, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आम्ही दुबईत पोहोचू तेव्हा सर्व १४० कोटी भारतीय आम्हाला पाठिंबा देतील. आम्ही चांगली कामगिरी करून २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी वानखेडे स्टेडियमवर आणण्याचा प्रयत्न करू.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma dance step on wankhede stadium stage to call shreyas iyer to join him video goes viral bdg