आयपीएलच्या बाराव्या हंगामात रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने हळुवार गतीने का होईना पण विजयाचा रस्ता पकडलेला आहे. आयपीएलमधे चाहत्यांची सर्वात जास्त पसंती असेला संघ म्हणून मुंबई इंडियन्सची ओळख आहे. आयपीएलच्या प्रत्येक सामन्यात रोहितची पत्नी रितीका आपल्या 3 महिन्यांच्या मुलीला म्हणजेच समायरला घेऊन मैदानात हजर असते. या दोघींचे फोटो आपण आतापर्यंत सोशल मीडियावर पाहिलेले असतील. रोहितची मुलगी समायरा सध्या स्पॅनिश शिकण्याचा प्रयत्न करतेय…रोहितने एक छोटा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

View this post on Instagram

Spanish lessons at 3months #muybien

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45) on

भारतीय संघातील हिटमॅन रोहित शर्मा आणि रितिका सजदेह या दाम्पत्याला डिसेंबर महिन्यात कन्यारत्न प्राप्ती झाली. त्यांनी तिचं नाव समायरा असं ठेवलं. काही दिवसांपूर्वी या शर्मा दाम्पत्याची मान अभिमानानं उचावली आणि त्याला कारण त्यांची तीन महिन्यांची समायरा ठरली आहे. ओल पेजेटा या वन्यजीव संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या संस्थेनं समायराचा गौरव केला आहे. केनियातील वन्यजीव संरक्षित क्षेत्रात जन्मलेल्या मादी गेंड्याला समायराचे नाव देण्यात आले आहे. दोन महिनेच्या कन्येचा झालेला हा गौरव पाहून बापमाणूस रोहितचे डोळे पाणावले आणि त्याने ट्विटरद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यात भर म्हणून समायरा चक्क स्पॅनिश भाषा समजण्याचा प्रयत्न करत आहे. आयपीएलच्या व्यग्र वेळापत्रकातही रोहित मुलीला अधिकाधिक वेळ देत आहे.

Story img Loader